आटपाडी तालुक्यात दहा वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू

विजय पाटील
शुक्रवार, 18 मे 2018

सांगली - जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे गावात विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऋग्वेद वाघमारे (वय10) असे मुलाचे नाव आहे. 

सांगली - जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे गावात विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऋग्वेद वाघमारे (वय10) असे मुलाचे नाव आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दुपारी तीन मित्र खेळत खेळत विहिरी जवळ गेले. ते विहिरीत आंघोळ करण्यासाठी उतरले. ऋग्वेदही अंघोळ करण्यासाठी विहिरीत गेला. मात्र त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. अधिक तपास सुरू आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.. 

Web Title: Sangli News 10 years boy dead in Atpadi Taluka