कडेगावातील दत्त पतसंस्थेच्या १३ शाखाधिकाऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

कडेगाव - येथील दत्त नागरी सहकारी पतसंस्थेने बोगस ठेवीदार तयार करून ६० लाखांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पतसंस्थेच्या १३ शाखाधिकाऱ्यांना कडेगाव पोलिसांनी अटक केली.

कडेगाव - येथील दत्त नागरी सहकारी पतसंस्थेने बोगस ठेवीदार तयार करून ६० लाखांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पतसंस्थेच्या १३ शाखाधिकाऱ्यांना कडेगाव पोलिसांनी अटक केली.

पतसंस्थेला शासनाने १ कोटी ५७ लाख ३३ हजारांचे पॅकेज दिले होते. यामध्ये ६० लाख १७ हजार ८३ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सांगली लेखा परीक्षक दिलीप एडके यांनी कडेगाव पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार संस्थेचे शाखाधिकारी तानाजी महादेव गरुड (वय५५ रा.कडेपूर), रवींद्र निवृत्ती शिंदे (वय ४३ रा. चिखली), हितेंद्र एकनाथ घोडके  (वय ५४ रा. कडेगाव), हणमंत जगन्नाथ जाधव (वय ५१ रा.कडेगाव), वसंत महादेव शिंदे  (वय ४९ रा.कडेगाव), शिवाजी नारायण राऊत (वय ४८ रा. कडेगाव), तानाजी रामचंद्र शिंदे (रा. चिखली), इनायतुल्ला मन्सूर तांबोळी (वय ५५ रा. कडेगाव), किसनसिंह फत्तेसिंह रजपूत (वय ५६ रा. कडेगाव), संजय सदाशिव गायकवाड (वय ५१ रा. कडेगाव), जुबेर जमुलाल बागवान (वय ४१ रा. तोंडोली), संतोष शामराव भोसले (रा. कोळेवाडी ता. कऱ्हाड), प्रशांत कृष्णाजी पाटील (वय ४१ रा. ताकारी ता. वाळवा) या संशयितांना अटक केली आहे.

डबघाईस आलेल्या पतसंस्थांना उभारी मिळण्यासाठी २००८-०९ मध्ये राज्यातील पतसंस्थांना बिनव्याजी आर्थिक मदत केली होती. यामध्ये दत्त पतसंस्थेस शासनाने १ कोटी ५७ लाख ३३ हजार रुपयांचे पॅकेज दिले होते. पतसंस्थेच्या कडेगाव 
येथील मुख्य शाखेसह कऱ्हाड, विंग, मसूर, पुसेसावळी, शिवडी, म्हासुरणे, तळमावले, पुसेगाव (जिल्हा सातारा), तडसर, तोंडोली शाळगाव, ताकारी, उपाळे मायणी अशा एकूण १६ शाखा आहेत. 

नियमबाह्य याद्या
दारिद्य्ररेषेखालील विधवा, पेन्शनधारक, परित्यक्ता यांना आर्थिक पॅकेजचा लाभ देणे बंधनकारक होते, मात्र सर्व शाखाधिकाऱ्यांनी मूळ शाखेत बसून ६५२ नवीन ठेवीदारांच्या याद्या नियमबाह्य तयार करून ६० लाख १७ हजार ८३ रुपयांचा अपहार केला.

Web Title: Sangli News 13 branch officers of Kadegaon Datta Patsanstha arrested