मिरजेतील आजी-माजी १३ नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

प्रमोद जेरे
मंगळवार, 5 जून 2018

मिरज - महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले १३ आजी-माजी नगरसेवकांनी आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला.

मिरज - महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले १३ आजी-माजी नगरसेवकांनी आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला.

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यामध्ये माजी महापौर व काँग्रेसचे नगरसेवक विवेक कांबळे, राष्ट्रवादीचे नगरसेवक सुरेश आवटी, त्यांचे चिरंजीव नगरसेवक निरंजन आवटी, संदीप आवटी, नगरसेवक शिवाजी दुर्वे यांच्यासह माजी नगरसेवक आनंदा देवमाने, महादेव कुरणे, विठ्ठल खोत, ‘मनसे’चे दिगंबर जाधव, शेतकरी संघटनेचे संभाजी मेंढे, उद्योजक गणेश माळी, भीमराव बुधनाळे, महेंद्र पाटील (कुपवाड) आणि अमोल सूर्यवंशी यांच्यासह अन्य वजनदार 
कार्यकर्त्यांचाही यात समावेश आहे.

सांगलीत होणाऱ्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीवेळी या सगळ्यांचा हा पक्षप्रवेश निश्‍चित होता; पण ही बैठक रद्द झाल्याने हा कार्यक्रम मुंबईत करण्याचे ठरले. 

आधी पक्षप्रवेश; मगच उमेदवारी
महापालिकेच्या येत्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांना अधिकृत पक्षप्रवेश केल्याशिवाय उमेदवारी द्यायची नाही, अशी भूमिका आमदार सुरेश खाडे यांनी घेतली. परिणामी ‘मिरज पॅटर्न’ मधील इच्छुक कोंडीत सापडले. त्यापैकी काहींनी आज भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. 

Web Title: Sangli News 13 corp-orators entered in BJP