मिरजेत पंधरा लाखांचा गुटखा जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

मिरज - कर्नाटकातून सांगली, सोलापूरसह कऱ्हाडमध्ये पाठवला जाणारा १५ लाखांचा गुटखा मिरज शहर पोलिसांनी पकडला. शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मिरज - कर्नाटकातून सांगली, सोलापूरसह कऱ्हाडमध्ये पाठवला जाणारा १५ लाखांचा गुटखा मिरज शहर पोलिसांनी पकडला. शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मिरजेतील महात्मा गांधी चौकात ही कारवाई झाली. कर्नाटकातून तयार गुटखा रात्रीत सांगली, सोलापूर, कऱ्हाडकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुटख्याची गाडी रात्री म्हैसाळ मार्गावरून गांधी चौकात आली असता पोलिसांनी पकडली. गाडीमध्ये १५ लाखांचा तयार गुटखा, सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title: Sangli News 15 lakhs Gutaka seize in Miraj