अठरा लाखांचा ऐवज बंगला फोडून पळविला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

विटा - बंगल्याच्या पाठीमागील खिडकी उचकटून चोरट्यांनी तिजोरीतील रोख अडीच लाख व सोन्या-चांदीचे दागिने असा १८ लाख २८ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला, अशी फिर्याद अमित प्रकाश शहा यांनी विटा पोलिसात दिली. ही चोरी (ता.१९) रात्री दीडच्या सुमारास झाली.

विटा - बंगल्याच्या पाठीमागील खिडकी उचकटून चोरट्यांनी तिजोरीतील रोख अडीच लाख व सोन्या-चांदीचे दागिने असा १८ लाख २८ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला, अशी फिर्याद अमित प्रकाश शहा यांनी विटा पोलिसात दिली. ही चोरी (ता.१९) रात्री दीडच्या सुमारास झाली.

सकाळी पावणे आठच्या सुमारास शहा यांच्या मुलीने आजीच्या खोलीकडे जावा काहीतर प्रॉब्लेम झाला आहे असे सांगितले. ते खोलीत गेले असता तिजोरी व कपाट उघडलेले दिसले.

कपाटीतील साहित्य खोलीत अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यामुळे चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कपाटातील अडीच लाखांची रोकड, ९ लाख ४५ हजारांची तीनशे पन्नास ग्रॅमची सोन्याची लगड, चाळीस हजार रुपयांच्या पंधरा ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, अठरा हजार नऊशे रुपयांची सात ग्रॅमची सोन्याची अंगठी, एक लाख आठ हजारांची चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे कॉईन्स, पंचेचाळीस हजार नऊशे रुपयांची एक मोत्याची दोन ग्रॅम वजनाची नथ, लहान मुलाचे पंधरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक लाख पंचाहत्तर हजार रुपयांची पाच किलो वजनाची चांदीच्या पाच लगड, ७० हजारांचा एक  चांदीचा सेट, ३५ हजारांची चांदीची बैठक, साडेसतरा हजारांचा पाचशे ग्रॅम वजनाचा एक चांदीचा तांब्या, एक फुलपात्र, साडेबावन हजाराच्या दीड हजार ग्रॅम वजनाच्या दोन चांदीच्या समई, एकवीस हजार रुपयांचे सहाशे ग्रॅम वजनाचे दोन चांदीचे पैंजण सेट, चौदा हजार रुपयांचे चारशे ग्रॅमचे सहा चांदीचे ग्लास, पस्तीस हजार रुपयांची एक किलो वजनाची ब्रिटीश कालीन, शिवकालीन पूजेची चांदीची नाणी असा एकूण अठरा लाख अठ्ठावीस हजार तीनशे रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक रवींद्र पिसाळ तपास करत आहेत. 

वीज गेली अन्... 
शहा यांचा मॉडर्न हायस्कूलसमोर बंगला आहे. ते  इंडियन ऑईलचे डिस्ट्रीब्युटर आहेत. रात्री बाराच्या सुमारास जोराचा वारा व पाऊस सुरू झाला.  त्यावेळी वीज गेल्याने घरात काय घडले हे काही समजलेच नाही. शहा यांचे वडील रात्री दीडच्या सुमारास घरी आले. त्यानंतर सर्वजण झोपी गेले. पैसे ते त्यांच्या आजीच्या खोलीतील तिजोरीत ठेवत असत.

Web Title: Sangli News 18 lakh robbery incidence in Vita