शिक्षा लागलेल्या 28 आजी-माजी नगरसेवकांची निर्दोष मुक्तता

विजय पाटील
बुधवार, 2 मे 2018

मिरज - महापालिका कार्यालयावर दगडफेक प्रकरणी आजी- माजी नगरसेवकांसह २८ जणावर शिक्षा सुनावण्यात आली होती. आज जिल्हा न्यायालयाने या सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे.  

मिरज - महापालिका कार्यालयावर दगडफेक प्रकरणी आजी- माजी नगरसेवकांसह २८ जणावर शिक्षा सुनावण्यात आली होती. आज जिल्हा न्यायालयाने या सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे.  त्यामुळे अनेक दिग्गजांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

मिरज शहरातील दूषित पाणी पुरवठा प्रश्नावर २००८ साली मिरजेतील सर्वपक्षीय समितीकडून मोर्चा काढण्यात आला होता. यामोर्चामध्ये मिरज शहरातील आजी-माजी नगरसेवकांसह विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. या मोर्च्या दरम्यान पालिका कार्यालयावर जोरदार दगडफेकीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी आजी-माजी नगरसेवक व प्रमुख नेत्यांसह २८ जणांच्या विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता .या खटल्यात मिरज प्रथमवर्ग न्यायालयाने २८ जणांना दोषी धरत दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

यामध्ये मिरजेतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या सात आजी- माजी नगरसेवकांचा समावेश होता.तर या निकाला विरोधात सर्व नेत्यांनी सांगली जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होती. यावर आज जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. ज्यामध्ये न्यायालयाने अपील मंजूर करत सर्व २८ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचा निकाल दिल्याची माहिती या खटल्यातील नगरसेवक सुरेश आवटी व इद्रिस नायकवडी यांनी दिली आहे .तर या निकालामुळे अनेक दिग्ग्जनगरसेवक आणि प्रमुख नेत्यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे . 

Web Title: Sangli News 28 corp orators Innocent freedom