सांगली इस्लामपूर रोडवर तुंगमध्ये ट्रक घुसला घरात

विजय पाटील
मंगळवार, 26 जून 2018

सांगली - सांगली इस्लामपूर रस्त्यावर कांदा घेऊन जाणारा ट्रक  तुंग गावात रस्त्याकडेला असणाऱ्या घरात घुसला. या अपघातामध्ये घराचे आणि गाडीचे नुकसान झाले आहे. या ट्रकमध्ये बसलेले शेतकरी जखमी झाले आहेत. ​

सांगली - सांगली इस्लामपूर रस्त्यावर कांदा घेऊन जाणारा ट्रक  तुंग गावात रस्त्याकडेला असणाऱ्या घरात घुसला. या अपघातामध्ये घराचे आणि गाडीचे नुकसान झाले आहे. या ट्रकमध्ये बसलेले शेतकरी जखमी झाले आहेत. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की  नगर, बीडहुन कांदा घेऊन ट्रक सांगलीतील मार्केटमध्ये सौद्यासाठी निघाले होते. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ट्रक  तुंग येथील वसंत जाधव यांच्या घरात घुसला. ट्रकच्या धडकेने घराची भित व शाैचालयाची भित पडली. या अपघातामध्ये ट्रकमध्ये बसलेले कादा उत्पादक शेतकरी आनिल रामदास जखमी झाले आहेत. तर एक आेमनी मोटार व मोटारसायकलीचेही यात नुकसान झाले आहे. तर एक म्हैस या अपघातामध्ये ठार झाली आहे. ट्रकचालक बंडु मोरे (बीड) हा अपघातानंतर फरारी झाला आहे. 

Web Title: Sangli News accident on Islampur Road