इटकरे फाट्याजवळ अपघातात पुणे येथील तीन ठार, दोन जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

इटकरे, ता. वाळवा - देवदर्शनाहुन परतणाऱ्या पुणे येथील तरुणांच्या मोटारीला इटकरे (ता. वाळवा, जि. सांगली) फाट्यानजीक आज पहाटे झालेल्या अपघात झाला. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्‍यातील आंतरराष्ट्रीय खेळाडूसह तिघे मित्र जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

इटकरे, ता. वाळवा - देवदर्शनाहुन परतणाऱ्या पुणे येथील तरुणांच्या मोटारीला इटकरे (ता. वाळवा, जि. सांगली) फाट्यानजीक आज पहाटे झालेल्या अपघात झाला. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्‍यातील आंतरराष्ट्रीय खेळाडूसह तिघे मित्र जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

अमोल लक्ष्मण मुंगसे (वय 24, रा. बिरदवडी, ता. खेड, जि. पुणे), दत्तात्रय जाधव (वय 25) व धनंजय पठारे (वय 28, दोघे रा. पठारवाडी, ता. खेड, जि. पुणे) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. धीरज विजय मुंगसे (वय 21 रा. बिरदवडी), रुपेश पठारे (वय 25, रा पठारवाडी) अशी जखमींची नावे आहेत.

बुधवारी सकाळी ते मोटारीने (क्र. एम. एच. 14 एफ. एम. 4047) मधून खेडहुन नृसिंहवाडी (जि. कोल्हापूर) येथे देवदर्शनासाठी आले होते. त्याच दिवशी रात्री देवदर्शन अटोपून हे सर्वजण पुण्याकडे निघाले होते. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील इटकरे फाट्याजवळ काही अंतरावर मोटारीचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. गाडी महामार्गाच्या डाव्या बाजूने दोनशे फुट अंतर फरपटत जाऊन झाडावर आदळली. यात गाडीच्या समोरील अर्ध्या भागाचा चक्काचूर झाला आहे. गाडीतील दोघेजण बाहेर फेकले गेले. तर तिघेजण गाडीतच अडकले. गाडीचे भाग घटनास्थळावर विखुरले होते.

पहाटेच्यावेळी महामार्गावरील अन्य प्रवाशांनी कुरळप पोलिसांना अपघाताची माहिती दिली. नागरिकांनी मृत व जखमींना गाडीतून बाहेर काढले. कुरळप पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक पाटील, हवालदार सुतार, कोल्हापूर महामार्ग पोलिस उपनिरीक्षक अशोक पाटील व नागरिकांनी जखमींना उपचारासाठी इस्लामपूरला हलवले.

बेसबाॅल आंतरराष्ट्रीय खेळाडूचाही मृतात समावेश
मृत अमोल मुंगसे हा बेसबॉलचा आंतरराष्ट्रीय खेळाडू होता. यापुर्वी त्याने श्रीलंकेत भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. अमोल मुंगसे व रुपेश पठारे यांचे चाकण येथे फुटवेअरचे दुकान आहे. धनंजय पठारे याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. रुपेश, दत्तात्रय व धनंजय हे तिघे विवाहीत आहेत. हे पाचजण मित्र आहेत. पठारवाडी व बिरदववाडी ही गावे लगतच आहेत. 

Web Title: Sangli News accident near Itkare Phata