माहुलीत डंपरची मोटारीला धडक, तीन ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

विटा - माहुली (ता.खानापूर) येथे डंपरची मोटारीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात तिघेजण जागीच ठार झाले. सुरेश किसन देवकाते (वय 45), सुनंदा किसन देवकाते (वय 67) व यश सुरेश देवकाते (6 वर्षे, सर्व जेजुरी,ता.पुरंदर,जि.पुणे) अशी त्यांची नांवे आहेत. तर सई सुरेश देवकाते (साडेचार वर्षे) व शोभा सुरेश देवकाते (वय 45,रा.जत), स्नेहलता किसन देवकाते (वय 40,जेजुरी) हे जखमी झाले आहेत.

त्यांना सांगली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज सकाळी साडेदहाच्या सुमारास माहुली एस. टी. पिकअप शेडजवळ झाला. अपघातानंतर डंपर चालक मात्र पळून गेला. देवकाते कुंटुंब कारने जेजूरीहून जयसिंगपूरला नातेवाईकांच्या लग्नासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांच्यावर मृत्यूने घाला घातला. दोन्ही वाहनांचे तीस हजार रुपये नुकसान झाले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. व पंचनामा केला. अपघाताची विटा पोलिसांत नोंद झाली आहे. 

Web Title: Sangli News accident near Mahuli 3 Dead