येलूर फाट्यानजीक अपघातात गोंदी गावठाणची महिला ठार

प्रसाद पाटील
बुधवार, 31 जानेवारी 2018

येडेनिपाणी - येलूर (ता. वाळवा) फाट्यानजीक यशवंत गार्डन समोर मोटारीला पाठीमागून एका अनोळखी वाहनाने धडक दिली. या अपघातात एक महिला ठार तर त्यांचे पती जखमी झाले आहे. याबाबत कुरळप पोलिसात अनोळखी वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.  

कोल्हापूरकडे निघालेल्या मोटारीस (क्र. एमएच 11 वाय 7461) सकाळी अकराच्या सुमारास अनोळखी वाहनाने जोराची धडक दिली. धडकेनंतर मोटार रस्त्या कडेला असलेल्या सिमेंट पोल व झाडावर जाऊन आदळली. यामध्ये सुनंदा बाळासाहेब देसाई (वय- ६५) जागीच ठार झाल्या तर त्यांचे पती बाळासाहेब विष्णू देसाई (दोघेही रा. गोंदी गावठाण, ता. कराड) जखमी झाले आहेत, त्यांना इस्लामुरच्या प्रकाश हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी दाखल केले आहे. बाळासाहेब हे स्वतःच गाडी चालवत होते. देसाई दाम्पत्य कोल्हापूर जिल्ह्यातील गंगापूर या मूळ गावी शेतीच्या कामासाठी निघाले होते. 

Web Title: Sangli News accident near Yelur Phata one dead