राज्यभरातील बिडीओंचे काम बंद आंदोलन, बुधवारी मुंबईत मोर्चा

संतोष भिसे
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

मिरज - राज्यभरातील गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले.

मिरज - राज्यभरातील गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले. परांडा तालुक्याचे गटविकास अधिकारी विजयसिंह नलवडे यांना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरु केले आहे. बुधवारी ( ता. 28 ) मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष आणि मिरजेचे गटविकास अधिकारी राहूल रोकडे यांनी सांगितले कि, नलवडे यांना मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती, पण कारवाई न झाल्याने महासंघाने आंदोलनाचा मार्ग पत्करला. कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना अशी मारहाण होणे निषेधार्ह आहे. बुधवारी अधिवेशनावर महासंघ मोर्चा काढणार आहे. पोलिस संरक्षण मिळावे, अशी आमची प्रमुख मागणी आहे. तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे. गेल्या काही महिन्यांत प्रथम वर्ग अधिकाऱ्यांवर हल्ल्या होण्याच्या पाच ते सहा घटना घडल्या आहेत. 

दरम्यान, आज सांगलीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांना जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांनी निवेदन दिले. पोलिस संरक्षणाची मागणी केली.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, राहूल रोकडे यांच्यासह मीना साळुंखे, दीपाली पाटील, संतोष जोशी,  संजय शिंदे, चिल्लाळ, रवीकांत अडसूळ आदी उपस्थित होते.  

Web Title: Sangli News agitation of Block Development Officers