शेतमालाला दर मिळावा यासाठी शिरढोणमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन

विजय पाटील
गुरुवार, 7 जून 2018

सांगली - जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संप आणखीन तीव्र झाला आहे. शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

सांगली - जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संप आणखीन तीव्र झाला आहे. शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

दूध, ऊस, डाळिंब, भाजीपाला रस्त्यावर आेतून कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथे आज शेतकऱ्यांनी आंदोलन केले. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. वाढत्या शेतकरी आत्महत्यांमुळे राज्यातील शेतकरी चिंतातुर झाला आहे.  दूध, साखर तसेच तुरीला योग्य भाव मिळत नसल्याने सांगली जिल्ह्याचा शेतकरी आता आक्रमक झाला आहे.

दीड एकरवर मी वांगी लागवड केली आहे. पण या वांग्यास पाच रुपये दर आहे. तोडणीचाही खर्च निघत नाही. यासाठी शेतमालास उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा मिळेल असा भाव द्यावा अशी आमची मागणी आहे
- सुदर्शन देर्डे,
आंदोलक शेतकरी

अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने हे आंदोलन केले आहे. भाजीपाला उत्स्फुर्तपणे रस्त्यावर टाकला आहे. भाजीपाल्यास पन्नास टक्के नफा स्वामिनाथन आयोगानुसार मिळायला हवा. आम्हाला प्रतिसरकार आणायची वेळ आणू नका, अशी आमची मागणी नाही. शेतकऱ्यांना भाव द्यायचा की नाही हे अद्याप सरकारचे धोरण ठरलेले नाही. शेतकऱ्याला कुजवत ठेवण्याचे काम हे सरकार करत आहे. 
- नारायण चौगुले,
आंदोलक शेतकरी

Web Title: Sangli News agitation of farmer in Shirdhon