म्हैशाळच्या पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांची गाडी अडविण्याचा काँग्रेस - राष्ट्रवादी नेत्यांचा इशारा

संतोष भिसे
शुक्रवार, 9 मार्च 2018

मिरज -  रविवारच्या ( ता. 11 ) दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची गाडी अडवणारच असा निर्धार कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त  केला. म्हैसाळ योजनेतून पाणी उपसा सुरु करावा. यासाठी आठवडाभरापुर्वी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले होते, मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याने या नेत्यांनी आज पुन्हा बैठक घेतली.

मिरज -  रविवारच्या ( ता. 11 ) दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची गाडी अडवणारच असा निर्धार कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त  केला. म्हैसाळ योजनेतून पाणी उपसा सुरु करावा. यासाठी आठवडाभरापुर्वी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले होते, मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याने या नेत्यांनी आज पुन्हा बैठक घेतली. 

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे, पक्षप्रतोद अनिल आमटवणे, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, प्रा. सिद्धार्थ जाधव, माजी सभापती दिलीप बुरसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बी. आर. पाटील आदी यावेळी उपस्थित होते.  

जिल्हा होरपळत असताना शासनाचा कानाडोळा संतापजनक आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापुर्वी उपसा सुरु झाला नाही, तर गाडी अडवणार आहोत. उपशासाठी अद्याप हालचाली नाहीत. वीज जोडण्यासाठी आदेश नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

- मनोज शिंदे

मिरजेसह कवठेमहांकाळ, जत, तासगाव आणि सांगोला तालुक्यांची पाण्याची गरज भागवणाऱ्या म्हैसाळ सिंचन योजनेतून उपसा सुरु करावा, अशी मागणी सुरु आहे. पाणीसाठे संपुष्टात आल्याने टंचाईचे ढग दाटू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी ( ता. 11 ) सांगली आणि कवठेमहांकाळ दौऱ्यावर येत आहेत. योजनेतून उपसा सुरु केला नाही, तर त्यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा या नेत्यांनी आठवडाभरापुर्वी दिला होता. दौरा तोंडावर आला तरी पाणी सोडण्याच्या हालचाली नसल्याने मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा निर्धार आज या नेत्यांनी पुन्हा व्यक्त केला. 

वसंतराव गायकवाड , प्रमोद इनामदार, तानाजी पाटील,  संतोष देसाई, विराज कोकणे, गंगाधर तोडकर हेदेखील उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन 
सिंचन योजनांच्या वीजबिलासाठी शासन 81 टक्के आणि शेतकरऱ्यानी  19 टक्के वीजबिल भरावे, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. याबद्दल काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. 

Web Title: Sangli News agitation for Mheshal water