सांगलीत उद्यापासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

सांगली - नेचर केअर फर्टिलायझर प्रस्तुत ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शुक्रवारपासून (ता. ५) येथील नेमिनाथनगरमधील कल्पद्रुम क्रीडांगणावर होणारे प्रदर्शन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक ज्ञान तंत्रज्ञानाची पर्वणी असेल. मे. बी. जी. चितळे आणि चितळे जिनस एबीएस इंडिया प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत. 

महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणाऱ्या ॲग्रोवनने सतत नव्याचा ध्यास धरताना शेतकऱ्यांना सतत एक पाऊल पुढे ठेवण्याचा प्रयत्न  केला आहे. कृषी प्रदर्शने हा त्या प्रयत्नांचा एक भाग. राज्यभरातील शेती क्षेत्रातील तंत्रज्ञान, माहितीची देवाण-घेवाणीचे ही प्रदर्शने साधन ठरली आहेत. पश्‍चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी सांगलीच्या ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शनास भेट देत असतात. यंदाही विविध नामवंत कंपन्यांचा सहभाग आहे. 

त्यात तंत्रज्ञान, खते, औषधे, अवजारे, यंत्रसामग्री, शेतीची बहुपयोगी वाहने, ट्रॅक्‍टर्स, शेततळी, मल्चिंग तंत्र, कापणी यंत्रे, जैविक कीटकनाशके, विद्राव्य खते, हरितगृह तंत्रज्ञान, प्रगत बियाणे, टिश्‍यू कल्चर, ठिबक व तुषार सिंचन यातील या कंपन्या आहेत. कृषी क्षेत्राशी संबंधित विविध प्रकाशनांचे साहित्याचे स्टॉल्स आहेत. पशुविषयक माहितीचे विशेष दालन असून त्यात वीर्य बॅंक, दुधाळ जातीची माहिती, त्यातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असेल.

तीन दिवसांत द्राक्ष, डाळिंब, ऊस, केळी, हळद या नगदी पिकांच्या लागवडीविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मिळेल. द्राक्ष- डाळिंब निर्यातीबाबत मागर्दर्शन होणार आहे. 

Web Title: Sangli News Agrowon agriculture exhibition