‘अग्रोवन’ प्रदर्शनासाठी मंडप उभारणीला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

सांगली - जिल्ह्यात नेचर केअर फर्टीलायझर प्रस्तूत ‘ॲग्रोवन’चे प्रदर्शन पाच जानेवारीपासून आहे. स्टॉल बुकींगला चांगला प्रतिसाद आहे. मे. बी. जी. चितळे आणि चितळे जिनिएस प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत. प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा प्रारंभ आज कल्पद्रुम मैदानात झाला. तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 

सांगली - जिल्ह्यात नेचर केअर फर्टीलायझर प्रस्तूत ‘ॲग्रोवन’चे प्रदर्शन पाच जानेवारीपासून आहे. स्टॉल बुकींगला चांगला प्रतिसाद आहे. मे. बी. जी. चितळे आणि चितळे जिनिएस प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत. प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा प्रारंभ आज कल्पद्रुम मैदानात झाला. तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 

नेचर केअर फर्टीलायझर व नेचर केअर ऑग्रॅनॉमिक्‍सचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत कुलकर्णी, मे. बी. जी. चितळे अँड सन्स आणि चितळे जिनिएसचे सुजित पाटील, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी, वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) उदय देशपांडे, सहाय्यक व्यवस्थापक राहूल कुलकर्णी, इव्हेंटचे परितोष भस्मे, शेखर रसाळ, ॲग्रोवनचे व्यवस्थापक शीतल मासाळ उपस्थित होते. 

सांगलीत पाच ते सात जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शन आहे. तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. स्टॉल बुकींगसाठी मोजकेच स्टॉल शिल्लक आहेत. प्रदर्शनात ट्रॅक्‍टर्स, हार्वेस्टिंग यंत्रे, विविध प्रकारची अवजारे, कापणी यंत्रे, जैविक कीटकनाशके, विद्राव्य खते, ग्रीन हाऊस टेक्‍नॉलॉजी आणि इप्लिमेंटस्‌, बियाणे उत्पादक, टिश्‍यू कल्चर, ठिबक व तुषार सिंचन, पॅकेजिंग आणि कोल्ड स्टोअरेज उद्योजक, ग्रेडिंग, वेइंग, सॉर्टिंग अवजारे उत्पादक कंपन्या, बॅंका व कृषी शिक्षण संस्था, कृषी साहित्य प्रकाशन, कृषी संशोधन संस्था व शासनाचे विविध विभाग सहभागी होणार आहेत.

प्रदर्शनामध्ये द्राक्ष, ऊस, हळद, डाळिंबाविषयी उत्पन्न वाढीच्या तंत्राचा जागर होणार आहे. प्रदर्शनांतून शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, अवजारांची माहिती एकाच छताखाली मिळणा आहे. पशूधनाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. 

दरम्यान, द्राक्ष, डाळिंब, ऊस, केळी, हळद या नगदी पिकांच्या लागवडीविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मिळणार आहे. द्राक्ष, डाळिंब  निर्यातीबाबत मागर्दर्शन होणार आहे. सांगली, सोलापूर, कर्नाटकचा सीमाभाग, कोल्हापूर, सातारा, कराड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

  •  स्टॉल बुकिंग ः शीतल (९८८११२९२९३) 
  •  प्रदर्शन स्थळ ः कल्पद्रुम मैदान (नेमीनाथनगर, विश्रामबाग, सांगली)
Web Title: Sangli News Agrowon exhibition