बाळू भोकरेचा साथीदार अक्षय शिंदेला अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

सांगली - खंडणी प्रकरणी फरारी असलेला गुंड बाळू भोकरेचा साथीदार अक्षय माणिक शिंदे (वय 23, रा. गणेश नगर, सांगली) याला शहर पोलिसांनी अटक केली. मार्चमध्ये या टोळीने एकावर खंडणी दिली नाही, म्हणून तलवारीचा हल्ला करुन जखमी केले होते.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बाळू भोकरे आणि त्याच्या तीन साथीदारांनी पाच मार्च रोजी गणेशनगरमध्येच एकाकडे खंडणी मागितली होती. त्याने खंडणी देण्यास नकार दिल्याने त्याच्यावर तलवार हल्ला करुन गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल आहे. यातील धिरज कोळेकर याला पोलिसांनी अटक केली होती. तर इतर बाळू भोकरेसह इतर तिघेजण फरार होते. गेल्या आठवड्यात पोलिसांनी केलेल्या ऑल आऊट ऑपरेशनमध्ये धीरज आयरे याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली. तर काल रात्री दहाच्या सुमारास अक्षय शिंदे याला शहर पोलिसांनी अटक केली. या सर्वांवर
खंडणी मागणे, हल्ला करुन जखमी करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आदी गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Sangli News Akshay Shinde arrested

टॅग्स