सर्व एचआयव्ही संसर्गितांना आता ‘एआरटी’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

नवे धोरण लागू - जिल्ह्यात मिळणार २३ हजार रुग्णांना औषध
सांगली - एचआयव्ही बाधित रुग्णाचा सीडी-फोर ५०० पेक्षा खाली येण्याची प्रतीक्षा न करता त्याला एआरटी औषध सुरू करण्याचे नवे धोरण लागू करण्यात आले आहे. राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण संस्था दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण संस्था, मुंबई यांनी ‘ट्रीट ऑल पॉलिसी’ सुरू केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता २३ हजारांवर रुग्णांना हा औषध पुरवठा केला जाणार आहे. 

आतापर्यंत सामान्य रुग्णांचा सीडी-फोर काउंट ५०० पर्यंत खाली आल्यानंतरच एआरटी औषधे सुरू केली जात होती. संसर्गित व्यक्ती गर्भवती नसल्यास किंवा संधिसाधू आजाराची लागण झाली नसल्यास एआरटी औषधे सुरू करण्यात येत नव्हती. आता ‘एचआयव्ही’सह जगणाऱ्या सर्वांनी ही औषधे घ्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.

एखाद्यास एचआयव्ही संसर्ग झाल्यास पांढऱ्या पेशी मारण्यास सुरवात होते. साधारण व्यक्तीच्या शरीरात सीडी-फोरचे प्रमाण ४१० ते १४९० एवढे असते. एचआयव्ही संसर्गामुळे ते कमी होऊन संधिसाधू आजार होतात. एआरटी औषधप्रणाली शरीरातील विषाणूंची वाढ थांबवून सीडी-फोर वाढविण्यास मदत करते. विवेक सावंत यांनी सांगितले, की जिल्ह्यात औषधोपचार रुग्णांची संख्या आठ हजार ५९३ होती. नवीन धोरणामुळे संख्या २३ हजार ३५१ होईल.

औषधांचे केंद्र
वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मिरज), उत्तर जिल्हा रुग्णालय (इस्लामपूर) व भारती वैद्यकीय महाविद्यालय यांसह उपजिल्हा रुग्णालय (कवठेमहांकाळ), ग्रामीण रुग्णालय- जत, आटपाडी, विटा, तासगाव, पलूस व शिराळा या लिंक एआरटीच्या माध्यमातून ही सेवा दिली जाते.

Web Title: sangli news All HIV infected people now have 'ART'