खासदारांनी आधी ऊस उत्पादकांच्या एफआरपीचे पैसे द्यावेत - आमदार अनिलराव बाबर 

प्रताप मेटकरी
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

विटा - यशवंत कारखान्याबाबत चुकीची माहिती देत बसण्यापेक्षा खासदार संजय पाटील यांनी आधी ऊस उत्पादकांच्या एफआरपीचे पैसे द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे आमदार अनिलराव बाबर यांनी पत्रकार परिषदेत केली. 

खानापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व बाबर विरोधक खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येवून आमदार अनिलराव बाबर यांच्यावर टीका करत आहेत. त्यावर आज (ता.15) आमदार बाबर यांनी पत्रकार परिषद घेवून टिकेला प्रतिउत्तर दिले. 

विटा - यशवंत कारखान्याबाबत चुकीची माहिती देत बसण्यापेक्षा खासदार संजय पाटील यांनी आधी ऊस उत्पादकांच्या एफआरपीचे पैसे द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे आमदार अनिलराव बाबर यांनी पत्रकार परिषदेत केली. 

खानापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व बाबर विरोधक खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येवून आमदार अनिलराव बाबर यांच्यावर टीका करत आहेत. त्यावर आज (ता.15) आमदार बाबर यांनी पत्रकार परिषद घेवून टिकेला प्रतिउत्तर दिले. 

खासदार संजय पाटील यांच्यावर टीका करताना आमदार बाबर म्हणाले, "सगळी समदुःखी सर्व विरोधक मंडळी माझ्याविरोधात एकत्र आली आहे. विमनस्क झाल्याने त्यांनी दहशतीची आणि दादागिरीची भाषाही सुरू केली आहे. पण हे प्रकार मला नवीन नाहीत. उलट माझीच प्रशासकीय दहशत असल्याचे सांगत आहेत, असली प्रशासकीय दहशत कोण करते ? हे जिल्हयालाच नाही, तर राज्याला माहिती आहे. मी होणाऱ्या टिकेकडे आजवर दुर्लक्ष करत आलो, माझी आणि सामान्य जनतेची नाळ घट्ट आहे. त्यामुळे मी सहा निवडणूका लढलोय मला कधीही बॉडीगार्ड घेवून फिरायला लागले नाहीत. धमक्‍या देताय, दहशत करणार असाल तुम्ही सांगाल तिथे येण्याची माझी तयारी आहे. धमक्‍यांना आणि दादागिरीला घाबरण्याऱ्यातला मी नाही".

ते पुढे म्हणाले की,"मला कधीही सत्तेची आणि पैशाची मस्ती आलेली नाही आणि येणार नाही. त्यामुळेच एवढी वर्षे राजकारणात टिकून आहे आणि यशस्वीही होत आहे. मला विकासाची मात्र निश्‍चित मस्ती आहे. राज्यात भाजप - शिवसेना युतीचे सरकार आहे. मंत्रीमंडळातील मुख्यमंत्र्यांसह भाजपचे मंत्री मला मदत करतात. त्यामुळे मी विकासकामे करतो. प्रत्येक कामाच्यावेळी मी मुख्यमंत्री, महसूलमंत्री व मदत केलेल्या मंत्र्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो. मी भाजपला श्रेय देत असेल तर भाजपच्या खासदारांना पोटशूळ का ? काँग्रेस नेत्यांच्या व्यासपीठावर जावून तुम्ही माझ्यावर टीका करता माझ्याबद्दल एवढा तुम्हाला व्यक्‍तीव्देष आहे. तर तुम्ही थेट मुख्यमंत्र्यानाच मला मदत करू नका, म्हणून सांगा.  खानापूर तालुक्‍यात ज्यांना बरोबर घेवून फिरताय, त्यांना एकदा भाजपामध्ये घेवून टाका म्हणजे तुम्ही काहीतरी पक्षवाढीचे काम करताय असे तरी दिसेल आणि भाजपप्रवेशाचे माझेही दार बंद होईल. मी अद्याप माझा मतदार संघ सोडून तासगावातल्या राजकारणात लक्ष घातले नाही, असेही ते म्हणाले.   

अमरसिंह देशमुख यांच्या टिकेला उत्तर देताना ते म्हणाले, मी विधानसभेपर्यंत भाजप - शिवसेना युतीच्या सरकारच्या मदतीनेच घाटमाथ्यावर टेंभूचे पाणी आणणारच आहे. तुम्ही कशाला नकारात्मक विचार करता. मी विधानसभेला उभा राहणार याची एवढी कसली भीती वाटते आहे.

विरोधकांना खुले आव्हान

ग्रामपंचायत निवडणूकीबाबत समोरासमोर व्यासपीठावर येवून तालुक्‍यातील प्रत्येक नेत्याने माझ्या ग्रामपंचायती किती आल्या ? ते सांगावे आणि मी माझ्या किती आल्या तेही सांगतो, असे खुले आव्हानही आमदार बाबर यांनी यावेळी विरोधकांना  दिले. 

Web Title: Sangli News Anilrao Babar Press