आमदार विलासराव जगतापांच्या मुलाविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

माडग्याळ - जत तालुक्‍यातील कोंतेवबोबलाद येथे ग्रामपंचायत निवडणूक वादातून श्रीशैल सौदाप्पा कांबळे (वय ५०) यांना काठी व पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार काल (रविवारी) रात्री साडेअकराच्या दरम्यान घडला. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात आज ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माडग्याळ - जत तालुक्‍यातील कोंतेवबोबलाद येथे ग्रामपंचायत निवडणूक वादातून श्रीशैल सौदाप्पा कांबळे (वय ५०) यांना काठी व पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार काल (रविवारी) रात्री साडेअकराच्या दरम्यान घडला. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात आज ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात आमदार विलासराव जगताप यांचे चिरंजीव व पंचायत समिती सदस्य मनोज जगताप यांच्यासह नऊ जणांचा समावेश आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोंतेवबोबलादची निवडणूक लागली आहे. काल रात्री मनोज जगताप, रमेश एकनाथ जगताप, तुकाराम जगताप, नवनाथ जगताप, शिवाजी जगताप, धैर्यसिंग जगताप, अमर जगताप, गोपाळ जगताप व कुलदीप जगताप या नऊ जणांनी श्रीशैल कांबळे यांना ‘तू आमच्याविरोधात निवडणुकीस का उभा राहतोस?’ असे म्हणत काठ्या व पट्ट्यांनी मारहाण केली.

घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक नागनाथ वाकुडे, सहायक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे तातडीने पोचले. त्यांनी पंचनामा केला. आज दिवसभर पोलिस उपाधीक्षक वाकुडे उमदी पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते. श्रीशैल यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. कोंतेवबोबलादमध्ये बंदोबस्त आहे. 

Web Title: Sangli News Astrocity crime on MLA Vilasrao Jagtap