बाजार समिती आटपाडी तालुक्यात उभारणार चार पेट्रोल पंप

नागेश गायकवाड
गुरुवार, 21 जून 2018

आटपाडी - आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीसह तालुक्यात चार ठिकाणी पेट्रोल पंप उभा करणार असल्याची माहिती कृषी पणन मंडळाचे संचालक आणि बाजार समितीचे अध्यक्ष भाऊसो गायकवाड यांनी दिली.

आटपाडी - आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीसह तालुक्यात चार ठिकाणी पेट्रोल पंप उभा करणार असल्याची माहिती कृषी पणन मंडळाचे संचालक आणि बाजार समितीचे अध्यक्ष भाऊसो गायकवाड यांनी दिली.

बाजार समितींचे उत्पादन वाढविण्यासाठी पणन मंडळ आणि राज्य सरकारने शक्य तेथे  बाजार समितीच्या आवारात पंप उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर विविध कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. पेट्रोल पंप उभारण्यासाठी आटपाडी बाजार समितीने प्रतिसाद दिला आहे. आटपाडी बाजार समितीच्या आवारात आणि करगणी, खरसुंडी आणि दिघंची येथील उपबाजार आवारात हे पेट्रोल पंप उभा केले जाणार आहेत.  कंपन्यांनी या जागेची पाहणी केली आहे असल्याची माहिती श्री गायकवाड यांनी दिली. हे पेट्रोल पंप या बाजार समिती चालविणार आहेत, तसे शक्य नसल्यास भाडेतत्त्वावर कंपनीला दिले जाणार आहेत.

Web Title: Sangli News Atapadi Taluka Market committee Petrol Pump