‘एटीएम’ केंद्रांवर पैशांचा ठणठणाट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

सांगली - आर्थिक वर्षअखेरनिमित्त बॅंकांमध्ये गडबड सुरू असताना नागरिकांची सोय म्हणून असलेल्या एटीएम केंद्रांवर आज पैशाचा ठणठणाट जाणवत होता. दुपारनंतर शहरातील बऱ्याच ‘एटीएम’मध्ये पैसे नसल्याने नागरिकांची मोठी अडचण झाली; तर जिल्हा परिषदेसमोरील एका ‘एटीएम’मध्ये मात्र ग्राहकांची रांग लागली होती.

बॅंकांचे वर्षअखेर मार्चमध्ये असते. त्यामुळे ३१ मार्च हा आर्थिक वर्षअखेरचा दिवस. त्यापूर्वी सलग दोन दिवस सुट्या आल्या होत्या. त्यामुळे आज सकाळपासून बॅंकांमध्ये गडबड सुरू होती.

त्यामुळे ‘एटीएम’मध्ये रोकड जमा करण्याचेही त्यांना भान राहिले नाही. दुपारपर्यंत पैसे निघत होते. मात्र, दोननंतर बहुतेक एटीएम केंद्रे रिकामी व्हायला लागली. थोड्या वेळातच त्यातील पैसेही संपल्याने तेथे रोकड उपलब्ध नसल्याची स्लीप मिळू लागली. नागरिक एका ‘एटीएम’वरून दुसऱ्या, तिसऱ्याच्या शोधात फिरत होते. मात्र, तेथेही असाच अनुभव येत गेला. विश्रामबागपासून शहरातील अनेक एटीएम केंद्रांमध्ये पैशांचा ठणठणाट होता. जिल्हा परिषदेसमोरील एका केंद्रावर पैसे मिळत होते. तेथे ग्राहकांची रांग लागली होती.

Web Title: sangli news atm center no money

टॅग्स