वाळव्यात शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

वाळवा - गहाणवट दिलेली जमीन मुदत संपल्यानंतर परत मागणाऱ्या धरणग्रस्त शेतकऱ्यावर येथे कोयता व दगडाने हल्ला झाला. त्यात धरणग्रस्त शेतकऱ्याच्या हात, तोंड व डोक्‍यावर दुखापत झाली आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य किसन रामजी  गावडे (रा. हाळभाग, वाळवा) यांच्यासह अन्य तीन अनोळखी लोकांच्या विरोधात राकेश रमाकांत चिंदरकर (वय ३२, रा. धरणग्रस्त वसाहत, इस्लामपूर रस्ता, वाळवा) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

श्री. चिंदरकर यांचे आजोबा यशवंत गणपत बुरके यांनी आठ वर्षे मुदतीने जालिंदर रामजी गावडे (रा. हाळभाग, वाळवा) यांना दीड एकर जमीन गहाणवट दिली होती. त्याची मुदत २०११ ला संपली होती. त्यानंतर त्यांचे नातू राकेश व रुपेश चिंदरकर यांनी ही जमीन परत मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता.

सलग सात वर्षे श्री. गावडे यांनी ही जमीन परत देण्यास टाळाटाळ केली. ७६६ चा १ चा १ ब, ७६६ चा २ चा १ ब चा २ या गटात ही शेती आहे. या जमिनीचा ताबा मिळण्यासाठी चिंदरकर यांनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना विनंती अर्ज केला होता. त्यांनही तसे आदेश दिले होते. मात्र २०११ पासून किसन गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाक दाखवून आमची जमीन आम्हाला परत केलेली  नाही. मंगळवारी (ता.२२) मी माझ्या शेतात गेलो असता किसन गावडे व त्याच्या अन्य तीन साथीदारांनी माझ्यावर कोयता व दगडांनी हल्ला केला, अशी फिर्याद राकेश चिंदरकर यांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणी किसन गावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. 
 
Web Title: Sangli News attack on farmer in Walava