ताकारीत तरुणीवर जीवघेणा हल्ला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

इस्लामपूर - ताकारी (ता. वाळवा) येथील महाविद्यालयीन तरुणीला ‘वारंवार छेडछाड करून त्रास का देतोस,’ अशी विचारणा करणाऱ्या तरुणीच्या भावासह कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना शनिवारी (ता. २७) रात्री घडली. यात संबंधित तरुणी आणि तिचा भाऊ दोघे गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी शुभम राजेंद्र पवार (वय २१, रा. दत्तमंदिराजवळ, ताकारी) याच्या विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

संबंधित तरुणी येथील एका महाविद्यालयात विज्ञान शाखेत अंतिम वर्षात शिकत आहे. कॉलेजला ये-जा करताना दोन वर्षांत शुभम पवार हा वारंवार ‘त्या’ तरुणीची छेड काढत होता. याबाबत दोघांच्याही कुटुंबीयांना माहिती होती. समज देऊनही तो त्रास देतच होता

यामुळे दोन्हीही कुटुंबांत तणावाचे वातावरण होते. यातून शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणी कुटुंबासह घरी असताना शुभम घरी आला आणि दरवाजा उघडून तरुणीच्या भावावर तलवारीने हल्ला चढवला. डोक्‍यावर आणि कंबरेवर वार केले. दरम्यान तरुणीने व तिच्या आजीने अडवण्यासाठी पुढाकार घेतला. ‘तेव्हा तुम्हाला जिवंत ठेवत नाही,’ असे म्हणत तरुणीवरही तलवारीने डोक्‍यात घाव घातला. तरुणीच्या आणि भावाच्या डोक्‍यात, तसेच तरुणीच्या कंबरेवर वार झाले आहेत. घरातील बहीण व आजी यांनाही ढकलून देत त्याने मारहाण व शिवीगाळ केली. मारामारी सुरू असताना आरडाओरडा झाल्यावर शेजारील प्रवीण सपकाळ, कपिल सपकाळ व अन्य काही तरुण जमा झाले. दरम्यान शुभमने घटनास्थळावरून पलायन केले. जमलेल्या तरुणांनी जखमी तरुणी व तिच्या भावाला खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. घटनेची इस्लामपूर पोलिस ठाण्यात नोंद असून सहायक पोलिस उपनिरीक्षक संग्राम शेवाळे तपास करीत आहेत.

Web Title: Sangli News attack on young Girl in Takari