इस्लामपुरात उद्योजकाचा अपहरणाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

इस्लामपूर - शहरातील ग्रीनराजनगर येथील उद्योजक वैभव शामराव यादव (वय ३७) यांचा रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून मोटारीतून अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी इस्लामपूर पोलिसांनी चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ‘तू आमच्यातील महिलेला फोन का करतोस’ असे धमकावत अपहरणाचा प्रयत्न केला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, यादव यांचे एमआयडीसीत एबल ग्लास इन्स्ट्रूमेंटस्‌ नावाची कंपनी आहे. 
यादव व त्यांचा अकौंटंट प्रशांत पडळकर १५ एप्रिलला वैभव कंपनीमधील केबिनमध्ये सायंकाळी सातच्‍या दरम्‍यान बसले होते. त्या वेळी कंपनीत दोन व्यक्ती आल्या. त्यांनी तुम्ही यादवसाहेब का, असे विचारत केबिनबाहेर बोलवले. तुम्ही आमच्या संबंधित महिलेला दोन वेळा फोन का केला’, असे विचारले. पडळकर यांना बाहेर जाण्यास सांगितले. 

दौघांपैकी एकाने मोबाईलवरील फोटो दाखवत तुम्ही या महिलेला फोन का केला, असे विचारले. यादव यांनी मी फोन केलेला नाही, असे सांगितले. त्यावेळी एकाने कमरेस असलेली रिव्हॉल्व्हर काढून त्यांच्या डोक्‍यास लावली व कंपनीच्या बाहेर चारचाकी गाडीकडे जबरदस्ती घेऊन गेले.

यादव यांनी प्रतिकाराचा प्रयत्न केला. गाडीत बसलेल्या एकाला त्याने बाहेर बोलवत ‘ये व मार याला’ असे म्हणू लागला. त्या व्यक्तीने हातातील कोयत्याने धमकावत त्यांना गाडीजवळ नेले. यादव यांनी आरडाओरड केली. त्या वेळी कंपनीसह परिसरातील आजूबाजूचे लोक जमा झाले. गर्दी पाहताच चौघांनी मोटारीतून पलायन केले. वैभव यादव यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे तपास करीत आहेत.

Web Title: Sangli News attempt to kidnap entrepreneurs in Islampur