बलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

आळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होत आहे. लेखिका सोनाली नवांगुळ (कोल्हापूर) संमेलनाध्यक्ष आहेत, अशी माहिती संयोजक प्रा. प्रशांत पवार यांनी दिली.

प्रा. पवार म्हणाले,""संमेलन तीन सत्रात आहे. सकाळी साडे नऊ वाजता ग्रंथ दिंडी निघेल. ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांच्या हस्ते उद्‌घाटन आहे. आदर्श शिक्षकांसाठीचा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त समिता पाटील (सांगली) स्वागताध्यक्षा आहेत. तहसीलदार वैशाली राजमाने (हातकणंगले), प्रा. कोमल कुंदप उपस्थित राहणार आहेत. तासगावच्या उपनगराध्यक्षा दीपाली पाटील, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर प्रमुख पाहुण्या आहेत.

प्रा. हसीना मुल्ला , शोभा औताडे, हणमंत सुर्यवंशी व सविता चौगुले यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. "ग्रामीण साहित्यात स्त्रियांचे योगदान' विषयावर परिसंवाद आहे. "साप्ताहिक सकाळ'च्या उपसंपादक प्राजक्ता ढेकळे अध्यक्षस्थानी आहेत. प्रा. सीमा चव्हाण व विद्या पवार सहभागी होणार आहेत. दुपारी तीन वाजता कवयित्री मनीषा पाटील (देशिंग) यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन आहे. सायंकाळी सात वाजता अर्चना लाड (कुंडल) व वैष्णवी देशमुख यांचे कथाकथन आहे. 

Web Title: Sangli News Balavadi Rural Marathi Sahitya Samhelan