बालगाव येथे योगदिनानिमित्त सामुदायिक सुर्यनमस्कार

विजय पाटील
गुरुवार, 21 जून 2018

सांगली - जागतिक योगदिनानिमित्त जत तालुक्यातील बालगाव येथे सामुदायिक सूर्यनमस्कार घातले. हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांनी घातलेल्या या सूर्यनमस्काराची मार्व्हलस, हायरेंज आणि एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे.

महाराष्ट्र शासन आणि बालगाव आश्रमकडून या योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सांगली जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. ५० एकर क्षेत्रावर या सूर्यनमस्कार योगासाठी नियोजन करण्यात आले होते. तीन हजाराहून अधिक कर्मचारी यासाठी कार्यरत होते. सांगली जिल्ह्यासह शेजारच्या कर्नाटक राज्यातून हजारो नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. शालेय विद्यार्थ्यांपासून आबालवृद्धांपर्यत यांचा समावेश होता. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख ,कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील यांच्यासह बालगाव आश्रमतील महाराज आदींनीही या उपक्रमात सहभाग घेतला होता. 

मनुष्य प्रसन्न व्हावा आणि माणसाची नकारार्थीवृत्ती दूर करण्यासाठी आश्रमांने राबवलेला हा उपक्रम स्तुत आहे.

- चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री

Web Title: Sangli News Balgaon Yoga Day special