कडेगावात दारूबंदीसाठी जोरदार आघाडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

कडेगाव - शहरांत दारूबंदीसाठी चार प्रभागांत महिला व दारूबंदी चळवळ समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आघाडी उघडली आहे. आडवी बाटली करण्यासाठी महिलांचे रविवारी (ता.२९) मतदान होत आहे. त्यानिमित्ताने येथे घरोघरी जाऊन मतदार महिलांना मतदान करण्यासाठी आवाहन केले जात आहे.

कडेगाव - शहरांत दारूबंदीसाठी चार प्रभागांत महिला व दारूबंदी चळवळ समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आघाडी उघडली आहे. आडवी बाटली करण्यासाठी महिलांचे रविवारी (ता.२९) मतदान होत आहे. त्यानिमित्ताने येथे घरोघरी जाऊन मतदार महिलांना मतदान करण्यासाठी आवाहन केले जात आहे. अशा रीतीने येथे चळवळीतील महिला आता दारूबंदीसाठी चांगल्याच आक्रमक झाल्या असून काहीही झाले तरी बाटली आडवी करणारच असा निर्धार त्यांनी केला आहे.

येथील प्रभाग क्र. नऊ, दहा, अकरा व चौदा अशा चार प्रभागात दारूबंदीसाठी महिलांचे मतदान होणार आहे. दारूबंदी चळवळीची व्यापकता आता वाढली असून या लढ्याला शहरांतील महिलांसह नागरिक व सर्वच  राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे दररोज सकाळी व संध्याकाळी दारूबंदीच्या प्रचारफेरीसाठी  महिला व नागरिकांची मोठी उपस्थिती असते. प्रचार अधिकाधिक प्रभावी करण्यासाठी अनेक ठिकाणी प्रबोधनात्मक डिजिटल लावले आहेत. तसेच ध्वनिक्षेपकाच्या सहाय्यानेही महिला मतदारांचे प्रबोधन व प्रचार सुरू आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. दारूबंदी चळवळीतील कार्यकर्ते सोशल मीडियावर चांगलेच ॲक्‍टीव्ह आहेत. तसेच दारूबंदी मतदानासाठी प्रशासकीय स्तरावरही जोरदार तयारी सुरू आहे. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चरण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
 

Web Title: Sangli News Ban on drink in Kadegaon