दिवाणजीस मारहाण कारणावरून बाजार समितीत बंद

अभिजित डाके
गुरुवार, 19 एप्रिल 2018

सांगली - सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाणजीला व्यापाऱ्याने बुधवार (ता.18) किरकोळ कारणावरून मारहाण केली. याच निषेधार्थ गुरुवार (ता.19)  सर्व हमाल, तोलाईदर, दिवाणजी एकत्र येऊन त्यांनी हळद, गुळ व इतर शेतीमालाचे सौदे बंद पाडले. त्यामुळे बाजार समितीत तणावाचे वातावरण निर्माण झाले.

बुधवारी अक्षय्यतृतीया आणि बसवेश्ववर जयंती असल्याने बाजार समितीला सुट्टी होती. मात्र अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर गुळ आणि हळदीचे सौदे सुरु होते. त्या दरम्यान दुपारी गूळ व्यापाऱ्याने त्याच्याच दुकानात काम करणाऱ्या दिवाणजीला किरकोळ कारणावरून मारहाण केली. याची माहिती बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना मिळताच ते बाजार समितीत दाखल झाले आणि त्यांनी वाद मिटवला. पण गुरुवारी सकाळी पुन्हा बाजार समितीचे संचालक आणि हमाल संघटना अध्यक्ष बाळासाहेब बंडकर यांच्यासह हमाल, तोलाईदार आणि दिवाणजी रस्त्यावर उतरले आणि बाजार समितीमधील सर्व शेतीमालाचे सौदे बंद पाडले. हमाल, तोलाईदार आणि दिवाणजी बाजार समितीच्या आवारात फिरून सौदे बंद करण्यासाठीचे आवाहन करत होते. यामुळे बाजार समितीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कालचा प्रकार जो झाला तो व्हायला नको होता. मात्र आज काम बंद करणे योग्य नाही. आम्ही दोघांची समजूत काढू असे आश्वासन मार्केट कमिटीने दिले आहे. 
- पी. एस. पाटील,
सचिव, सांगली बाजार समिती

व्यापाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
- बाळासाहेब बंडगःर,
 हमाल संघटना अध्यक्ष, बाजार समितीचे संचालक

Web Title: Sangli News band in Market committee