केंद्र, रिझर्व्ह बॅंक, नाबार्डला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

सांगली - राज्यातील जिल्हा बॅंकांकडील 500 व 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याबाबत पुणे जिल्हा बॅंकेच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने केंद्र सरकार, रिझर्व्ह बॅंक आणि नाबार्डला या संदर्भात म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी चार आठवड्यांनी होणार आहे. सांगलीसह कोल्हापूर, सातारा बॅंकांनीही स्वतंत्रपणे येथे याचिका दाखल केल्या आहेत. आता या सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी होणार आहे. 

जिल्हा बॅंकेकडे नोटाबंदी काळात जमा झालेले 301 कोटी रुपये रिझर्व्ह बॅंकेने स्वीकारले; मात्र आठ नोव्हेंबरपूर्वी जमा झालेल्या 500 व 1000 रुपयांमधील 14.72 कोटी रुपये रिझर्व्ह बॅंकेने स्वीकारले नाहीत. त्या निर्णयाविरोधात जिल्हा बॅंक सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा यांच्यासह राज्यातील काही बॅंकांनी याच मागणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. पुणे जिल्हा बॅंकेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांनी सुनावणीची तारीख निश्‍चित केली आहे. याबाबत सर्व याचिकांची एकत्रितच सुनावणी होणार आहे. 

सांगली जिल्हा बॅंकेने बुधवारी (ता. 19) सर्वोच्च न्यायालयात जुन्या नोटांबाबत याचिका दाखल केली आहे. ऍड. संजय खरे बाजू मांडणार आहेत. पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह बहुतांश बॅंका सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्ररित्या गेल्या आहेत. सर्वोच्च सोमवारी (ता. 24) सुनावणीच्या शक्‍यता होती. जिल्हा बॅंकेने आपले प्रतिनिधीही पाठवायची तयारी केली होती. 

गेल्या पंधरवड्यापासून बॅंक प्रशासन व संचालकांनी न्यायालयात जाण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव केली होती. आठ नोव्हेंबरपूर्वीचे जुन्या 500 व 1000 रुपयांचे जिल्हा बॅंकेकडे 14.72 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यातील 59 कोटी रुपये यापूर्वी रिझर्व्ह बॅंकेने जमा करून घेतले आहेत. ही शिल्लक रक्कमही तातडीने बदलून देण्यासाठी बॅंक संघटनेतर्फे प्रयत्न केले; मात्र त्याला यश आले नव्हते. 

Web Title: sangli news bank nabard Supreme Court notice