‘सकाळ’, जायंटस्‌तर्फे बुधवारी सायकल वाटप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

इस्लामपूर - होतकरू व गरजू मुलांना सायकल देण्याच्या ‘सकाळ’ आणि ‘जायंट्‌स ग्रुप ऑफ इस्लामपूर’ च्या उपक्रमाला शहर व परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ७५ सायकली जमा झाल्या. साधनांअभावी शिक्षणात अडथळे येऊ नयेत, हा विचार करून हा उपक्रम राबवला गेला.

इस्लामपूर - होतकरू व गरजू मुलांना सायकल देण्याच्या ‘सकाळ’ आणि ‘जायंट्‌स ग्रुप ऑफ इस्लामपूर’ च्या उपक्रमाला शहर व परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ७५ सायकली जमा झाल्या. साधनांअभावी शिक्षणात अडथळे येऊ नयेत, हा विचार करून हा उपक्रम राबवला गेला. त्याचे सामाजिक स्तरावर कौतुकही झाले. बुधवारी (ता. २५) मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना सायकली प्रदान केल्या जाणार आहेत.

जिल्हाधिकारी विजय काळम यांच्या हस्ते, उद्योजक काकासाहेब चितळे, सर्जेराव यादव, ‘सकाळ’चे निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, अध्यक्ष संदीप राठी यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी दोन वाजता जायंट्‌स हॉलमध्ये वितरण होईल.

‘सकाळ’ आणि जायंट्‌सने जागतिक सायकलदिनी दरवर्षी एक जानेवारीला ‘सायकल चालवा, निरोगी राहा’ असा संदेश देत रॅलीचे आयोजन केले जाते. सलग सात वर्षे उपक्रम सुरू आहे. त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागलेत. उपक्रमाचा एक भाग म्हणून इस्लामपूर शहर व परिसरातील नागरिकांनी जुन्या, वापरात नसलेल्या सायकली जमा कराव्यात, त्या दुरुस्त करून गरजूंपर्यंत पोहोच करू, असे आवाहन केले होते. शाळांकडून गरजू विद्यार्थ्यांची नावे घेतली. साधने, सोयी-सुविधांअभावी शिकण्यात अडचण आलेल्या विद्यार्थ्यांना आधार देण्याच्या केलेल्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळाला. 

 हे आहेत दाते...
प्रकाश पाटील, संजय पाटील, सुनील चव्हाण, विभावरी पाटील, शीतल निलाखे, विनायक गुरव, एच. टी. दिंडे, भक्ती दत्तात्रय माने, भगवान मोरे, सुनील भोसले, अर्जुन पन्हाळे, विक्रम पाटील, दुर्गेश एकुंडे, श्रीजित माळी, तानाजी अहिर, के. बी. कुरुंदवाडे, संजीवकुमार साळुंखे, जयवंत साळुंखे, राजेंद्र साळुंखे, प्रज्ञा पाटील, संभाजी माने, विकास पाटील, जालिंदर आडके, संजय पाटील, राजा माळगी, विजय तिबीले, रवींद्र माळी, ईश्वर पटेल, श्रुती चव्हाण, सायली जोशी, गोरख मंदृपकर, चंद्रकांत पाटील, अतुल दुकाने, दिलीप शहा, नितीन पारेख, संस्कृती माने, प्रगती राठी, नयना गायकवाड, राजाराम कदम, भास्कर चव्हाण, महेश कामेरीकर, रियाज मोमीन, शामराव पाटील, सतीश शेटे, साजिद तांबोळी, अवधूत पेठकर, महेश देशमुख, साहिल पाटील, चैतन्य जामदार, मोहन जामदार, गौतम रायगांधी, अमित शहा, संजय ओसवाल, संदीप थोरात, किरीट पटेल. तर विजयकुमार वडेर, सदानंद जोशी, अभिजित निकम, प्रकाश पोरवाल यांनी सायकल दुरुस्तीसाठी साहाय्य केले.

 

Web Title: Sangli News bicycle allocation by Sakal and Giants Group