बिसूरच्या तरुणास धमकी देवून लुटले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

सांगली - पुण्याहून आलेल्या बिसूरच्या तरुणास लिफ्ट देण्याच्या
बहाण्याने माधवनगर कॉटनमिलच्या परिसरात नेऊन धमकी देवून लुटल्याची घटना घडली. विकास बाळासाहेब पाटील (वय 30, रा. बिसूर, सध्या पुणे) असे तरुणाचे नाव असून त्याच्या गळ्यातील 13 ग्रॅमची सोन्याची चेन चोरट्याने पळवली.

याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विकास पाटील हे पुण्यात नोकरी करतात. तेथे शारदनगर, चिखली येथे राहतात. काल (सोमवारी) सकाळी साडेपाच वाजता ते सांगलीत आले होते. बिसूरला जाण्यासाठी ते कॉलेज कॉर्नर येथे थांबले होते.

त्यावेळी महेश साबळे (वय 30) हा दुचाकीवरुन निघाला होता. त्याच्याकडे विकासने लिफ्ट मागितली. महेशने लिफ्ट देण्यासाठी गाडी थांबवून त्याला सोबत घेतले. दोघे गाडीवरुन जात असताना माधवनगरजवळ बंद पडलेल्या कॉटनमिलजवळ महेश साबळेने गाडी मिलच्या गेटमधून आत नेली. एका झुडपाजवळ गाडी थांबवून त्याने एक दगड हातात घेतला आणि विकास पाटीलच्या शर्टाची कॉलर धरुन त्याला धमकी देत त्याच्या गळ्यातील सुमारे 22 हजार रुपयांची सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतली आणि तेथून पळून गेला. विकास पाटील यांनी गावात जाऊन घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला.

Web Title: Sangli News Bisur youth threatened and looted