पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज भाजप कार्यकारिणी बैठक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

सांगली - भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक उद्या (ता,. 22) बैठक आहे. पालकमंत्री सुभाष देशमुख उपस्थित राहणार आहेत. लोकमान्य टिळक स्मारकात बैठक आहे. भाजपच्या जिल्ह्यातील कामांचा आढावा घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. 

सांगली - भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक उद्या (ता,. 22) बैठक आहे. पालकमंत्री सुभाष देशमुख उपस्थित राहणार आहेत. लोकमान्य टिळक स्मारकात बैठक आहे. भाजपच्या जिल्ह्यातील कामांचा आढावा घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. 

भाजपने गेल्या अडीच वर्षात जिल्ह्यात चांगले बस्तान बसवले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्ष जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर राहिला. त्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात दोन महिन्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहे. साडेतीनशेहून अधिक गावांत निवडणूक होणार असल्याने भाजपला ग्रामीण भागात पाळेमुळे घट्‌ट करण्याची संधी मिळणार आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत चर्चा होण्याची शक्‍यता आहे. 

भाजपने दोन महिन्यांपुर्वी शिवारसंवाद यात्रा राबवली. पार्टीच्या आमदारांनी बांधावर जावून शेतकऱ्यांशी संवाद साधला. लोकांच्या अडचणी समजावून घेतल्या. सरकारच्या योजना, धोरणांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली. त्याचागी आढावाही यावेळी बैठकीत घेण्यात येईल. 

लो. टिळक स्मारक मंदिरात सकाळी 11 वाजता बैठक आहे. पक्षाच्या संघटनात्मक बाबी, ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी आदींचाही आढावा घेतला जाईल. पक्षाच्या सर्व आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी निमंत्रित केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दिली.

Web Title: sangli news bjp