मिरजेत भाजप कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने बुजवले खड्डे

संतोष भिसे
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

मिरज - शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेला कंटाळलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आज स्वतःच विधायक पाऊल उचलले. शिवाजी रस्त्यावरील मोठे खड्डे स्वतःच्या खर्चाने भरुन घेतले.

मिरज - शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेला कंटाळलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आज स्वतःच विधायक पाऊल उचलले. शिवाजी रस्त्यावरील मोठे खड्डे स्वतःच्या खर्चाने भरुन घेतले.

खड्ड्यांमुळे वाहतुकीची अडचण होत होती. दररोज हजारो वाहने या रस्त्यावरुन धावतात. गेल्या वर्षांपासून त्यावर अनेक ठिकाणी  खड्डे निर्माण झाले आहेत. महापालिकेला वारंवार निवेदने देऊनही दुरुस्तीची कार्यवाही झाली नाही, त्यामुळे वैतागलेले कार्यकर्ते स्वतःच पुढे आले. स्वखर्चाने मोठे खड्डे भरुन घेतले. त्यामुळे वाहतुक सुकर झाली.  

या त्यांच्या कार्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी गणेश चौगुले, महेश धयारे, राहुल गणेशवाडे, अजिंक्य हंबर, चैतन्य भोकरे, अमर चव्हाण, दादा चौगुले, अक्षय गायकवाड, अजय कदम, ऋषिकेश कुंभार, स्वप्निल गायकवाड, विनायक कुंभार, तुषार पाटील उपस्थित होते.

Web Title: Sangli News BJP activists repair potholes in Miraj

टॅग्स