भाजपची ‘ऑफर’ काँग्रेस-राष्ट्रवादीने धुडकावली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

सांगली - जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) ची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी भाजपने जिल्हा परिषद विभागातील २७ पैकी ८ जागा काँग्रेस-राष्ट्रवादीने घ्याव्यात, अशी ऑफर दिली होती. येथील संख्याबळानुसार १० जागा मिळायलाच हव्यात, अशी मागणी करत ती धुडकावण्यात आली. त्यामुळे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, विकास आघाडीच्या बहुतांश इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.

सांगली - जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) ची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी भाजपने जिल्हा परिषद विभागातील २७ पैकी ८ जागा काँग्रेस-राष्ट्रवादीने घ्याव्यात, अशी ऑफर दिली होती. येथील संख्याबळानुसार १० जागा मिळायलाच हव्यात, अशी मागणी करत ती धुडकावण्यात आली. त्यामुळे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, विकास आघाडीच्या बहुतांश इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.

जिल्हा परिषदेच्या २३ जागांसाठी ५८; नगरपालिकेच्या ३ जागांसाठी १४; तर नगरपंचायतीच्या एका जागेसाठी ८ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. काल रात्री या पक्षांतील दुसऱ्या फळीतील नेत्यांची बैठक झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या  निवासस्थानी झालेल्या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. त्यात काँग्रेसने ४, राष्ट्रवादीने ६ जागांची मागणी केली. भाजपने ८ जागा देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे चर्चा फिस्कटली. इच्छुक सर्वांना अर्ज करू देत, ज्येष्ठ नेत्यांसोबत पुन्हा एकदा बैठक घेऊन बिनविरोधचे प्रयत्न करू, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आज सकाळी ११ पासून जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच गडबड सुरू होती. एकेक अर्ज दाखल करून घ्यायला १५ ते २० मिनिटांचा वेळ लागत असल्याने रांगच लागली होती. तीन वाजेपर्यंत मुदत असताना सायंकाळी साडेचारपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. सोमवारी (ता. १४) छाननी होणार असून २४ ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. या काळात राजकीय खलबते चालणार आहेत. 

दरम्यान नगरपालिकेच्या ३ जागांसाठी १४ जणांनी अर्ज दाखल केले असून सर्वपक्षीय नेते या गटातही बिनविरोधचा प्रयत्न करणार आहेत. नगरपंचायतीसाठी एकमेव जागा असून आठ अर्ज दाखल झाले आहे. ही जागा खुल्या गटासाठी असल्याने चांगलीच चुरस लागणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सायंकाळी बैठक घेऊन उमेदवारी अर्जांची माहिती घेतली.  

घाई, गडबड
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद विभागातील अर्ज दाखल करण्यासाठी आज तब्बल पन्नासहून अधिक जण दाखल झाल्याने सकाळपासूनच घाई सुरू झाली. एकेक अर्ज दाखल करून घ्यायला वेळ लागत असल्याने बराच वेळ रांग लागली होती. ही गडबड सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू होती. तीन वाजता रांगेतील सर्वांना आत घेऊन दरवाजा बंद करण्यात आला.

यांनी भरले अर्ज 
जिल्हा परिषद -

(भाजप आघाडी) - मनोजकुमार मुंडगनूर, महिला- नीलम सकटे, सुलभा आदाटे. अरुण बालटे, सरदार पाटील, प्रमोद शेंडगे, निजाम मुलाणी, ॲड. शांता कनुंजे, अश्‍विनी पाटील, सरिता कोरबू, शोभा कांबळे. ब्रह्मदेव पडळकर, तम्मनगौडा रवी पाटील, सुहास बाबर, डी. के. पाटील, नितीन नवले, सुरेंद्र वाळवेकर, वंदना गायकवाड, सुनीता पवार, स्नेहलता जाधव, मंगला नामद, रेश्‍मा साळुंखे, आशा पाटील, सुरेखा जाधव.

काँग्रेस-राष्ट्रवादी व इतर - रेखा बागेळी, सुरेखा आडमुठे, वैशाली कदम, जयश्री पाटील, मनीषा पाटील, संगीता पाटील, संध्या पाटील, आशाराणी पाटील, जयश्री एटम, कलावती गौरगोंड, शारदा पाटील, अश्‍विनी नाईक, संभाजी कचरे, महादेव दुधाळ, संजय पाटील, धनाजी बिरमुळे, आशा झिमुर, भगवान वाघमारे, सत्यजित देशमुख, शरद लाड, विक्रम सावंत, विशाल चौगुले, जितेंद्र पाटील, अर्जुन माने-पाटील, सतीश पवार, चंद्रकांत पाटील, संजीव पाटील.

नगरपालिका - 
नागरिकांचा मागास प्रवर्ग - रोहिणी शिरतोडे (तासगाव), प्रतिभा चोथे (विटा), वैशाली सदावर्ते (इस्लामपूर). सर्वसाधारण - वीरशैव कुदळे (आष्टा), अभिजित माळी (तासगाव), झुंझारराव पाटील (आष्टा), विशाल शिंदे (आष्टा), जाफर मुजावर (तासगाव), पृथ्वीराज पाटील (विटा), पद्मसिंह पाटील (विटा), वैभव पवार (इस्लामपूर). सर्वसाधारण स्त्री - पूनम सूर्यवंशी (तासगाव), प्रतिभा पाटील (विटा), पुष्पलता माळी (आष्टा).

नगरपंचायत -

सर्वसाधारण - सागर सूर्यवंशी (कडेगाव), दिनकर जाधव (कडेगाव), वैशाली पाटील (कवठेमहांकाळ), उदयकुमार देशमुख (कडेगाव), चंद्रशेखर सगरे (कवठेमहांकाळ), सुनील माळी (कवठेमहांकाळ), अभिजित नाईक (शिराळा), गौतम पोटे (शिराळा).

Web Title: sangli news bjp offer reject by congress & ncp