बोअर खुदाई मालकांचा इस्लामपूरात बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

प्रति फूट 60 रुपये इतका दर मिळावा या मागणीसाठी कोल्हापूर, जयसिंगपूर आदी अनेक भागात बंद पाळण्यात आला आहे. आम्ही या संघटनेशी संलग्न असल्याने या बंद आम्ही सहभागी झालो आहोत. 

-  धनंजय भोसले, उपाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र रिग असोसिएशन 

इस्लामपूर -  गेल्या सात दिवसांपासून बाेअर खुदाई मालकांनी गाड्या बंद ठेऊन बंद पाळला आहे. खुदाईत  दरात वाढ मिळावी या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी  पश्चिम महाराष्ट्र रिग असोसिएशनच्या माध्यमातून हा बंद पाळण्यात आला आहे.  

सातत्याने होणारी डिझेल व ऑईलची दरवाढ, कामगारांचे वाढते पगार, देखभाल दुरुस्ती व त्यातच भर म्हणून आलेल्या जीएसटीने त्रस्त झालेल्या इस्लामपूर येथील बोअर मालकांनी दर वाढीसाठी गाड्या बंद ठेवल्या आहेत. बोअर खुदाई करणाऱ्या या वीस ते बावीस गाड्या येथील ख्रिचन बंगला परिसरात उभ्या आहेत.

प्रति फूट 60 रुपये इतका दर मिळावा या मागणीसाठी कोल्हापूर, जयसिंगपूर आदी अनेक भागात बंद पाळण्यात आला आहे. आम्ही या संघटनेशी संलग्न असल्याने या बंद आम्ही सहभागी झालो आहोत. 

-  धनंजय भोसले, उपाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र रिग असोसिएशन           

इस्लामपूर येथील पश्चिम महाराष्ट्र रिग असोसिएशनचे उपाध्यक्ष धनंजय भोसले, दिनेश पुजारी, भगवान कुऱ्हाडे, विकास पाटील, सिकंदर मुजावर हे खुदाई करणाऱ्या तामिळनाडू येथील २०-२२ गाड्या वाळवा तालुक्यात चालवीत आहेत. मात्र सध्या डिझेल व ऑईलचे दर वाढले असून कामगारांच्या पगारात वाढ झाली आहेत. तसेच गाड्या व मशीनच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात भर म्हणून आलेल्या जीएसटी बोअर मालक त्रस्त झाले आहेत. मात्र गेल्या कित्येक वर्षा पासून खुदाई करण्याचा दर प्रति फूट ५५ रूपये इतकाच आहे. तो प्रति फूट ६० रुपये करावा, अशी मागणी आहे.

Web Title: Sangli News boar diggers owners on strike