वराड खिंडीत अनोळखी महिलेचा खून

 वराड खिंडीत अनोळखी महिलेचा खून

शिराळा - येळापुर-वाकुर्डे बुद्रुक मार्गावरील वराड खिंडीत महिलेचा खून  करून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिस उपअधीक्षक किशोर काळे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

श्री. काळे म्हणाले, येळापुर- वाकुर्डे बुद्रुक मार्गावरील वराड खिंडीतील बाबाराम आटुगडे यांच्या जमिनी शेजारील नाल्या जवळील सिमेंट पाईप मध्ये अंदाजे ३५ ते ४० वर्ष वयाच्या महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे. तिचा चेहरा पूर्ण जळलेला आहे. तिच्या अंगावर जांभळया व गुलाबी रंगाची साडी आहे. उंची १६२ से. मी. असून हातापायावर मोठ्या जखमा आहेत. तिच्या उजव्या हातात अंगठ्या जवळील बोटात ओम लिहिलेली अंगठी आहे. दोन्हीं हातात काचेच्या व बेन्टेक्सच्या बांगड्या आहेत. या महिलेचा खून दोन- तीन आठवड्यापूर्वी घडला असल्याची शक्यता आहे. चेहरा ओळखत नसल्याने मृतदेहाची ओळख पटवणे महत्वाचे आहे. त्यासाठी आपल्या गावातील अथवा परिसरातील कोणती महिला बेपत्ता असल्यास शिराळा अथवा कोकरुड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. 

मृतदेह जळालेला असल्याने चरण प्राथमिक केंद्रातच वैद्यकीय अधिकारी सर्वदा निर्मळे यांनी शवविच्छेदन केले. मृतदेह असलेल्या  सिमेंटच्या  पाईप शेजारी मेलेले कुत्रे सडलेल्या अवस्थेत सापडले आहे. त्या कुत्र्याचा मृत्यू कशामुळे झाला याचाही तपास करण्यात येत आहे. कदाचित मृतदेहाचा वास हा त्या कुत्र्याचा वास असावा असा गैरसमज व्हावा, असा आरोपीने प्रयत्न केला असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.  

अंगठीच महत्वाचा धागा
चेहरा पूर्ण जळाला असल्याने ओळख पटवणे अवघड आहे, मात्र तिच्या उजव्या हातातील अंगठ्या जवळील बोटात ओम लिहिलेली अंगठी आहे. पायात जोडावे अथवा गळ्यात मंगळसूत्र अथवा इतर काही नाही. त्यामुळे ओळखीसाठी अंगठीच हा प्राथमिक एकमेव पुरावा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com