वाचन चळवळी अंतर्गत मुक्तांगण स्कुलतर्फे जवानांना पुस्तके भेट

धर्मवीर पाटील
गुरुवार, 25 जानेवारी 2018

इस्लामपूर - देशाच्या संरक्षणासाठी काश्मीरच्या सीमेवर लढण्यासाठी सज्ज असणाऱ्या मराठी भाषिक जवानांना विरंगुळा म्हणून देण्यात आलेली पुस्तके लष्करी ग्रंथालयात दाखल झाली. येथील मुक्तांगण प्ले स्कूल तर्फे वाचन चळवळीच्या माध्यमातून पुस्तके देण्यात आली आहेत.

इस्लामपूर - देशाच्या संरक्षणासाठी काश्मीरच्या सीमेवर लढण्यासाठी सज्ज असणाऱ्या मराठी भाषिक जवानांना विरंगुळा म्हणून देण्यात आलेली पुस्तके लष्करी ग्रंथालयात दाखल झाली. येथील मुक्तांगण प्ले स्कूल तर्फे वाचन चळवळीच्या माध्यमातून पुस्तके देण्यात आली आहेत.
   
प्रजासत्ताक दिनी पेठ (ता. वाळवा) येथे ३२ जवानांना पुस्तके भेट दिली जाणार आहेत. इस्लामपूर शहरातील प्रा. डॉ. संजय थोरात यांनी सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येऊन वाचन चळवळ चालवली आहे. चळवळीच्यावतीने मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी गेल्या चार महिन्यात आतापर्यंत ४५ जवानांना सुमारे पंधराशे पुस्तके भेट दिली आहेत. 

लष्करी जवानांना मराठी साहित्य वाचायला देण्यासाठी हा प्रयत्न आहे. तेथील ग्रंथालयात बहुभाषिक पुस्तके उपलब्ध होतील.

- प्रा. डॉ संजय थोरात

माभागात कार्यरत असलेल्या जवानांमध्ये मराठी युवकांची संख्या लक्षणीय आहे. या ठिकाणी असणाऱ्या ग्रंथालयात मात्र केवळ इंग्रजी आणि हिंदी भाषेतील पुस्तके आहेत. इथे मराठी जवानांना वाचण्याची इच्छा असली तरी पुस्तके नसल्याने पर्यायी मार्ग शोधावे लागत होते. वाचन चळवळीच्या माध्यमातून आता या जवानांना मराठी साहित्य वाचायला मिळेल. सुट्टीला आलेल्या प्रत्येक जवानाला संपर्क करून २५ पुस्तके भेट दिली जातात.                

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येथील जवान सुजीत शिवाजी काळे यांना मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये समारंभपूर्वक पुस्तके भेट दिली होती. माजी उपनगराध्यक्ष संजय कोरे, प्रा. डॉ. संजय थोरात, प्रा. डॉ. दीपक स्वामी, मिलिंद थोरात, प्रा. महेंद्र टिळे यांच्या उपस्थितीत मुक्तांगणचे सचिव विनोद मोहिते, वर्षाराणी मोहिते व चिमुकल्या मुलांसह पालकांनी पुस्तके भेट दिली होती.

योजनेला प्रतिसाद
 काश्मीरच्या अकनूर राजोरु सेक्टर येथील ४९ आरमार्ड रेजिमेंट कंपनीचे कर्नल आर एस जहाल यांनी वाचन चळवळ उपक्रमाचे कौतुक केले आहे.  लष्करी ग्रंथालयात जवान सुजीत काळे यांनी पुस्तके जमा केली. श्रीरंग कुंभार (अमरावती ) वसंत करांडे (धुळे) यांनी पहिल्या दिवशी पुस्तके वाचली.  

३२ जवानांना पुस्तके भेट
माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक आणि  वाचन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (ता. २६) प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पेठ (ता. वाळवा) येथे ३२ जवानांचा पुस्तके भेट देऊन सन्मान केला जाणार आहे.

Web Title: Sangli News books given to soldiers by Islampur Muktangan School