सांगली ‘बीएसएनएल’ मोबाईल नेटवर्कमध्ये राज्यात अग्रस्थानी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जुलै 2017

सांगली - ‘बीएसएनएल’ च्या महाराष्ट्र टेलिकॉम सर्कलमध्ये सांगली बीएसएनएलने मोबाईल नेटवर्कमध्ये अग्रस्थान मिळवले असल्याची माहिती प्रधान महाप्रबंधक रवी कांत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, ‘‘बीएसएनएलने लॅंडलाईन ग्राहकांना दर रविवार २४ तास कोणत्याही नेटवर्कवर तसेच दररोज  रात्री नऊ ते सकाळी सातपर्यंत मोफत बोलण्याची सोय दिली आहे. लॅंडलाईन कनेक्‍शन फक्त ४९ रुपये मासिक भाडे देऊन घेऊ शकता. या योजनेत नवीन ग्राहकांना इन्स्टॉलेशन शुल्क माफ केले आहे. 

ब्रॉडबॅंडसाठी २४९ रुपये मासिक शुल्क असलेली योजना वर्षासाठी आहे. ग्रामीण भागात २ हजार कि.मी. ऑप्टीकल फायबर  केबल टाकून मोबाईल सेवा खुली केली आहे. गावांसाठी तसेच शाळा, महाविद्यालयासाठी ब्रॉडबॅंडची सुविधा दिली जाईल.’’

श्री. कांत म्हणाले,‘‘बीएसएनएल ने थ्री-जी नेटवर्क २४ टक्केवरून ६० टक्केपर्यंत वाढवले आहे. थ्री-जी नेटवर्कचा स्पीड चांगला आहे. प्री-पेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी आकर्षक योजना उपलब्ध आहेत. मोफत कॉलिंगसाठी भारत स्वाभिमान, महाकृषी संचार प्लॅन्स उपलब्ध आहेत. सध्या अनेक कंपन्या ग्राहकांना  आकर्षक प्लॅन देत असताना बीएसएनएल देखील त्यासाठी प्रयत्नशील आहेत. फाईव्ह-जी नेटवर्क घेऊन बीएसएनएल बाजारात येऊ शकते. मोबाईल नेटवर्क उपलब्धतेमध्ये सांगली बीएसएनएल ने राज्यात अग्रस्थान मिळवले आहे.’’

सहायक महाप्रबंधक जे. बी. कांबळे, सौ. प्रिया महाजन, मंडल अभियंता आर. जी. जंबगी आदी उपस्थित होते.

Web Title: sangli news bsnl mobile network