सांगलीच्या मांजरीला पुण्यात उपविजेतेपद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

सांगली - पुण्यातील मांजराच्या सौंदर्यस्पर्धेत सांगलीच्या ए. एच. राजपूत यांच्या मांजरीने दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. राजपूतांच्या या लाडक्‍या मांजरीचे नाव बटरफ्लाय आहे.

सांगली - पुण्यातील मांजराच्या सौंदर्यस्पर्धेत सांगलीच्या ए. एच. राजपूत यांच्या मांजरीने दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. राजपूतांच्या या लाडक्‍या मांजरीचे नाव बटरफ्लाय आहे. तिचे झुपकेदार केस, निरागस चेहरा प्रेमात पडावे असाच. वंशाने पर्शियन असलेल्या या मांजरीची किंमत थोडी थोडकी नव्हे तब्बल दिड लाख रुपये इतकी आहे. 

राजपूतांच्या या मांजरीचा थाटही राजेशाही आहे. तिची खाण्यापिण्याची भांडी, निवास व्यवस्थेची स्वतंत्र सोय आहे. आहारही तिच्यासाठी खास मागवलेला असतो. राजपूत यांनी दोन वर्षांपूर्वी ही मांजरी आणली. सहा महिन्यांपूर्वीच तिला चार छान गोंडस पिल्लंही झालीत. पेट शोच्या निमित्ताने या मांजरीची सर्वत्र भटकंती असते. तेव्हा एसी गाडीची सोय लागते. पुण्यातील पेट शो फेस्टीव्हल'मध्ये तिने दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. गोव्यातील "कॅट शो'मध्येही या मांजरीनं बेस्ट ज्युनिअर आणि बेस्ट इन शो असे किताब मिळवले आहेत. 

Web Title: Sangli News Cat wins in Pune Beauty contest

टॅग्स