रक्षा टाकली झाडांच्या मुळाला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

सांगली - कुची ( ता. कवठेमहांकाळ ) येथे शिवाजी पांडुरंग पाटील यांचे रक्षाविसर्जन पारंपरिक पद्धतीला फाटा देत रक्षा झाडांच्या मुळांशी घालून वृक्षारोपण करण्यात आले. कर्मकांड टाळून पर्यावरणपूरक पद्धतीने हे विधी झाले.  

सांगली - कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे शिवाजी पांडुरंग पाटील यांचे रक्षाविसर्जन पारंपरिक पद्धतीला फाटा देत रक्षा झाडांच्या मुळांशी घालून वृक्षारोपण करण्यात आले. कर्मकांड टाळून पर्यावरणपूरक पद्धतीने हे विधी झाले.  

दिलीप व त्यांचे बंधू संतोष (यशवंत) पाटील यांनी मराठा सोशल ग्रूप्रचे सभासद ए. डी. पाटील, आर. एस. पवार, शंकर पाटील, शामजीकाका, माजी सभापती एन. के. पाटील, रामचंद्र पाटील, सुखदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वडीलांचे अंत्येष्ठी विधी पार पाडले. 

निवृत्त ग्रामविकास अधिकारी शिवाजी पाटील (वय 82) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यानंतर अंत्यसंस्कार व आज रक्षाविसर्जन झाले. तत्पूर्वी कुटुंबियांनी कर्मकांडाला फाटा देण्याचा निर्णय घेतला. दिलीप व यशवंत पाटील यांच्यासह त्यांच्या आई कमल पाटील यांनीही कालबाह्य रूढी, परंपरेला फाटा देत दहावा, तेरावा असे कोणतेही विधी करू नयेत याला संमती दिली.  पाटील कुटुंबियांच्या निर्णयामुळे मराठा समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरांचा त्याग करण्याच्या सुधारणावादी विचारांच्या प्रचार, प्रसाराला बळ मिळाले आहे. 

कर्मकांडात अडकलेल्या मराठा समाजाने आता पोथ्या पुराणांची संख्या कमी करून आता विज्ञानाची पुस्तके हाती घ्यावीत. समाजाने वाचन केले तरच प्रगती शक्‍य आहे.

- दिलीप पाटील  

Web Title: Sangli News change in traditional method for conservation of environment