बालकामगार प्रथेविरुद्ध जिल्ह्यात जागर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

सांगली - आंतरराष्ट्रीय बालकामगार प्रथाविरोधी दिनानिमित्त जिल्ह्यात राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पातर्फे जनजागृती सप्ताह साजरा केला. सहा तालुक्‍यात पथनाट्य सादरीकरण व चित्ररथाचे आयोजन केले होते. 

सांगली - आंतरराष्ट्रीय बालकामगार प्रथाविरोधी दिनानिमित्त जिल्ह्यात राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पातर्फे जनजागृती सप्ताह साजरा केला. सहा तालुक्‍यात पथनाट्य सादरीकरण व चित्ररथाचे आयोजन केले होते. 

जिल्ह्यात बालकामगार विरोधी जनजागृती सप्ताहाचे उद्‌घाटन विशेषता या जनजागृती अभियानाद्वारे जिल्ह्यातील 6 तालुके व जवळपास 40 गावांमध्ये बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृती करण्यात प्रकल्प यशस्वी ठरला आहे. या माध्यमातून बालकामगार कामावर ठेवू नये, बालकामगारा संबंधी असणारे कायदे, बालकांचे संविधानिक हक्क, लहान वयात कामामुळे बालकांवर होणारे दुष्परिणाम व शिक्षणाचे महत्त्व अशा विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली. जनजागृती सप्ताहात बालकामगार कायदेविषयक परिपत्रके वाटण्यात आली. हॉटेल मालक व वीटभट्टी मालकाकडून बालकामगार कामावर ठेवणार नाही, असे हमीपत्र लिहून घेण्यात आले. 

प्राथमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, सरकारी कामगार अधिकारी संजय महानवर, राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाचे जिल्ह्याचे प्रकल्प संचालक सूर्यकांत कांबळे, क्षेत्रीय अधिकारी अरुण पाटील यांच्या उपस्थितीत सप्ताहाचे उद्‌घाटन करण्यात आले. बालकामगार समस्येविरुद्ध प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून बालकांना कामावर ठेवणाऱ्यांविरुद्ध तक्रार नोंदवून बालकांना शोषणातून मुक्त करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन प्रकल्प संचालक सूर्यकांत कांबळे यांनी केले. सप्ताहामध्ये प्रकल्पांतर्गत सुरू असणाऱ्या विशेष प्रशिक्षण केंद्रांमार्फत बालकामगार विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर स्पर्धांचे आयोजन केले होते. या जनजागृती अभियानास संबंधित तालुक्‍यांचे नायब तहसीलदार, तलाठी, आगार व्यवस्थापक व इतर सरकारी अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

Web Title: sangli news child labour