सांगलीत 32 बालकांना जंतनाशक गोळ्यांची बाधा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

विटा - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे ढवळेश्‍वर (ता. खानापूर, जि. सांगली) येथील अंगणवाडीतील 32 बालकांना जंतनाशक गोळ्यांची बाधा झाली. या मुलांना आज सकाळी अकराच्या सुमारास उपाशीपोटी या गोळ्या दिल्याने उलट्या सुरु झाल्या असे आरोग्य विभागाचे प्राथमिक निदान असले तरी कारण वेगळेच असावे अशी शंका आहे. 25 मुलांवर विटा ग्रामीण रूग्णालयात सध्या उपचार सुरू असून त्यापैकी गंभीर 8 बालकांना सांगलीत सिव्हील रुग्णालयात हलवण्यात आले. 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत 1 ते 19 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत जंतनाशक औषध वाटप केले जाते. जंतनाशक गोळ्याचे वाटप झाल्यानंतर लगेचच मुलांना उलट्या सुरु झाल्या. पोटात दुखणे, अचानक गुंगी आल्याने मुले अस्वस्थ झाली. अंगणवाडी सेविकांनी पालकांना बोलावून सर्वांना विटा ग्रामीण रूग्णालयात हलवले. काही मुलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर अन्य अस्वस्थ मुलांना सांगलीला हलवण्यात आले. दरम्यान रूग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली. पालक आणि नातेवाईकांमध्ये भितीचे वातावरण होते. 

गोळ्यांबाबतच संशय ? 
मुलांना दिलेल्या गोळ्यांचे नमुणे आरोग्य अधिकारी डॉ राम हंकारे यांच्याकडे मागितले असता त्यांनी ते देण्यास नकार दिला. या गोळ्याच कालबाह्य झाल्या असल्याचा संशय काही पालकांनी व्यक्त केला.

Web Title: sangli news children