विट्यात आजपासून होणार स्वच्छतेचे सर्व्हेक्षण

प्रताप मेटकरी
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

विटा - स्वच्छ विटा सर्वेक्षण 2018 स्पर्धेच्या पाहणीसाठी सर्वेक्षण तपासणीपथक आज (ता.12)  विटा शहरात दाखल होत आहे. 12 ते 16 जानेवारी या कालावधीत विटा शहरातील स्वच्छतेची पाहणी हे पथक करणार आहे.

विटा - स्वच्छ विटा सर्वेक्षण 2018 स्पर्धेच्या पाहणीसाठी सर्वेक्षण तपासणीपथक आज (ता.12)  विटा शहरात दाखल होत आहे. 12 ते 16 जानेवारी या कालावधीत विटा शहरातील स्वच्छतेची पाहणी हे पथक करणार आहे.

शंभर टक्के लोकसहभागातून विटा शहराला स्वच्छ व सुंदर शहर करण्याचा विटा पालिकेने प्रयत्न केला आहे. पाहणी पथकाकडून नागरिकांना प्रश्ने विचारण्यात येणार आहेत. त्याला नागरिकांनी योग्य प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

 

मुख्याधिकारी महेश रोकडे म्हणाले, "स्वच्छ सर्वेक्षणाच्या सर्व मार्गदर्शक तत्वांची सर्वस्तरावर काटेकोरपणे अंमलबजावणी विटा पालिकेने केलेली आहे. प्रत्येक प्रभागनिहाय या अभियानात सक्रियपणे काम करणाऱ्या 2100 युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वच्छतादूत म्हणून पालिकेच्यावतीने प्रमाणपत्र देवून या मोहिमेत सहभाग करून घेतले आहे. 40 कचरावेचक महिलांना ओळखपत्र देवून त्यांच्याकडून प्रभागनिहाय प्लॅस्टिक गोळा केले जात आहे. शहरातील 16 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पाहणी पथकाकडून नागरिकांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्‍नांना जबाबदार विटेकर नागरिक या नात्याने प्रत्येकाने सकारात्मक उत्तरे द्यावीत. 1969 या टोल फ्री क्रमांकावर मिसकॉल द्यावा. त्यास प्रतिसाद म्हणून कॉलवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्‍नांनाही होय, अशीच उत्तरे दयावीत डाऊनलोड केलेल्या वेबसाईटवरील सर्व प्रश्‍नांना होय उत्तराने फिडबॅक दयावा, असेही आवाहन मुख्याधिकारी रोकडे यांनी केले.

Web Title: Sangli News Cleanliness survey in Vita