गवार @ 100 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

सांगली - पेट्रोल आधी शंभरी गाठणार की भाजीपाला, असं बोललं जायचं. या स्पर्धेत आज भाजीपाल्याने बाजी मारली आहे. त्याची मानकरी ठरली आहे गवार...गवारीचा प्रतिकिलोचा दर शंभर रुपयांवर पोचला आहे. सकाळी झालेल्या सौद्यात 850 ते 900 रुपयांना 10 किलो असा भाव निघाला. ग्राहकांना 100 ते 110 रुपये किलोने गवारी विकली गेली. 

गेल्या आठवड्यात 50 ते 60 रुपये किलो असलेला लसूण 100 रुपयांवर पोचला. महागाई वाढली असल्याने 10 ते 15 रुपये असा किलोचा दर असणारा टोमॅटोही महागला. तो आता 25 ते 30 रुपये किलो झाला आहे. पाऊस सुरू झाल्याने आवक घटल्याचा परिणाम दिसू लागला. ढबू मिरचीची आवक वाढली आहे. दरात 10 रुपयांनी घसरण होत तो 40 रुपयांवर आला आहे. मिरचीचा दर 80 रुपयांवर कायम आहे. फ्लॉवर 50 ते 60, कोबी 25 ते 30, भेंडी 50 ते 60, दोडका 80, तसेच वांगी 80 रुपयांवर स्थिर आहे. कांदा-बटाटा 15 ते 20 रुपये दराने विकला जातोय. मेथी, पालक, तांदळी, शेपू 15 ते 20 रुपये, तर कोथिंबीर 25 रुपयांना पेंडी कायम आहे. 

गवार का महागली? 
हॉटेलमध्ये फारच कमी मागणी असलेली गवारी गृहिणींच्या मात्र पहिल्या पसंतीची. पावसाळी वातावरणात गवारीच्या उत्पन्नात घट झाली. आवक खाली आली आहे. तुलनेत अन्य भाजीपाल्यांचे दर 60 ते 80 रुपये किलो आहेत. त्यात गवारी पहिल्या पसंतीची असल्याने तिचे भाव नेहमीच चढे राहतात. त्याचाच परिणाम म्हणून गवारीने शंभरी गाठली आहे.

Web Title: sangli news cluster bean