अकरावीची प्रवेश प्रक्रिया आजपासून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

सांगली - जिल्ह्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया आजपासून (ता. २७) सुरू होत आहे. प्रवेश अर्ज मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडणार आहे. प्रवेश अर्ज देणे व स्वीकारण्याची मुदत २७ ते ३० जून आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढल्याने सांगलीसह प्रमुख शहरातील कनिष्ट महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेला प्रवेश मिळवण्यासाठी रस्सीखेच होणार असल्याचे चित्र दिसत आहे. अकरावीचे वर्ग ११ जुलैपासून सुरू होणार आहेत. 

दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर २४ जूनला विद्यार्थ्यांच्या हातात गुणपत्रक मिळाले. मागील काही दिवसांपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेकडे लक्ष लागले होते. जिल्ह्यातून ४२ हजार ९१० विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी ३९ हजार ६५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकरावी प्रवेशाची लगबग सुरू होत आहे. प्रवेशासाठी अर्ज देणे व स्वीकारण्याची मुदत २७ ते ३० जून आहे. प्रवेश अर्जांची छाननी, तपासणी व गुणवत्तेनुसार निवड यादी व प्रतीक्षा यादी १ ते ४ जुलै या कालावधीत प्रसिद्ध होईल. निवड यादी व प्रतीक्षा यादी ५ जुलै रोजी संबंधित कनिष्ठ महाविद्यालय, अकरावीचे वर्ग असलेल्या उच्च माध्यमिक शाळांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध होईल. 

निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ६ ते १० जुलै हा कालावधी निश्‍चित केला आहे. प्रवेश शिल्लक असल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना १३ व १४ जुलै रोजी प्रवेश दिले जातील. रिक्त जागांवर एटीकेटी धारक विद्यार्थ्यांना १५ व १७ जुलै रोजी प्रवेश मिळतील. दरम्यान अकरावी वर्ग ११ जुलैपासून नियमित सुरू होतील. अकरावी आणि तंत्रशिक्षणसाठी तब्बल ५५ हजार जागा उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील २३२ कनिष्ठ महाविद्यालयात अकरावील प्रवेश मिळणार आहे. त्यामध्ये १८० अनुदानितचा समावेश आहे. सरकारी आयटीआय दहा, खासगी आयटीआय पंधरामध्ये ३ हजार ७०० आणि डीप्लोमाच्या २२ कॉलेजमध्ये साडेसहा हजार जागा उपलब्ध आहेत. गतवर्षीऐवढाच निकाल लागला असल्याने प्रवेशाची गैरसोय होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतू काही कनिष्ट महाविद्यालयांना अधिक पसंती दिली जात असल्याने प्रवेशाचा गोंधळ होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: sangli news college admission