जातीयवादी सरकार हटवण्यासाठी लढा - माकपचा निर्धार

जातीयवादी सरकार हटवण्यासाठी लढा - माकपचा निर्धार

सांगली - केंद्र, राज्यातील जातीयवादी सरकार हटवणे, हा पहिला उद्देश समोर ठेवून काम सुरू करा. या सरकारविरुद्ध दलित, शोषितांचा राग उफाळून आला आहे. मात्र हा विद्रोह जातीय समीकरणांत पुन्हा अडकू नये, याची खबरदारी घ्या, असा कानमंत्र मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस, माजी खासदार सीताराम येचुरी यांनी माकपच्या राज्य अधिवेशनाच्या सांगता सभेत दिला. 

येथील मराठा समाज भवनमध्ये तीन दिवस चाललेल्या २२ व्या अधिवेशनाची आज सांगता झाली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसह सतरा ठराव करण्यात आले. राज्य सरचिटणीस माजी आमदार नरसय्या अाडम अध्यक्षस्थानी होते. येचुरी म्हणाले, ‘‘सर्व लढ्यांसाठी लाल झेंडा लागतो,  मात्र मतदानावेळी तो बाजूला राहतो. त्याची कारणमीमांसा करा.

प्रमुख ठराव
जमीन अधिग्रहण कायद्याविरुद्ध संघर्ष तीव्र करणे, कामगार कायद्यातील कामगार विरोधी बदलांविरुद्ध संघटित लढा देणे, संघटित कामगारांत पक्षाचा राजकीय प्रभाव मजबूत करण्यावर भर देणे.

जातीयवादी शक्तींना पराभूत करण्यासाठी आपणास केवळ सामाजिक परिवर्तनाची लढाई लढून चालणार नाही, ती आर्थिक परिवर्तनाची करावी लागेल. त्यासाठीचे धोरण केंद्र पातळीवरून आखण्याबाबत चर्चा होईलच, या देशात क्रांतीची ठिणगी महाराष्ट्रातून पडते. ती या वेळीही पडू दे.’’

सरकारकडील मागण्यांचे ठराव - शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी. गारपीट, बोंडअळी ग्रस्त शेतकऱ्यांना पुरेशी भरपाई. शेतकऱ्यांना सरसकट व विनाअट कर्जमाफी. गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनातील सूत्रधारांना अटक करून शिक्षा व्हावी. भीमा कोरेगाव दंगलीचा निषेध. मनोहर भिडे, मिलिंद एकबोटे या सूत्रधारांना अटक. जनतेला आरोग्य अधिकार. योजना कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सोडवा. असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी योजना आणि महामंडल अमलात आणा. अपंग, निराधार, शेतकरी, शेतमजुरांना दरमहा पाच हजार पेन्शन. महिलांवरील वाढत्या अत्याचाराला प्रतिबंध करा. नोकर भरतीवरील बंदी उठवा. संघटित कामगारांना किमान वेतन, पेन्शन, अन्य सुविधा देणारा केंद्रीय कायदा करा, अल्पसंख्याक समाजावरील वाढते हल्ले रोखा. न्यायमूर्ती लोयांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी.

यावेळी स्वागताध्यक्ष ॲड. व्ही. वाय. पाटील, ॲड. सुभाष पाटील, कॉ. उमेश देशमुख यांच्यासह सांगलीतील पदाधिकाऱ्यांनी या अधिवेशन नियोजनाची सूत्रे  सांभाळली. सुधा सुंदरमन, डॉ. अशोक ढवळे, निलोत्पल बसू आदी उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com