राज ठाकरे यांच्या विरोधात सांगलीमध्ये भाजपची पोलिसात तक्रार

विजय पाटील
सोमवार, 19 मार्च 2018

सांगली - मनसे नेते राज ठाकरे यांच्या विरोधात सांगलीमध्ये भाजप ने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चिथावणी देऊन दोन समाजामध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली.

सांगली - मनसे नेते राज ठाकरे यांच्या विरोधात सांगलीमध्ये भाजप ने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चिथावणी देऊन दोन समाजामध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली.

मुंबईमध्ये मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या भाषण प्रकरणी भाजपने संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रर दिली. यावेळी राज ठाकरे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यासमोर निदर्शनेही करण्यात आली. 

समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे. पुढील काळात देशात दंगल होणार आहे असे त्यांनी उघडपणे सांगितले आहे. हे त्यांना कोणी सांगितले. 

- नीता केळकर, महिला प्रदेशाध्यक्ष 

Web Title: Sangli News complain against Raj Thakare