नागठाण्यात काँग्रेस भाजप कार्यकर्ते आमने-सामने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

वाळवा - नागठाणे (ता. पलूस) येथे ग्रामसचिवालय इमारत पायाभरणीवरून  वाद पेटला आहे. ग्रामसचिवालयच्या इमारत निधी मंजूरीवरून भाजप आणि काँग्रेस हे आमने-सामने आल्याने, नागठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

नागठाणे येथे ग्रामसचिवालयाच्या इमारतीचा पायाभरणीचा कार्यक्रम आज (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजता आमदार विश्‍वजीत कदम, आमदार मोहनराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. मात्र या कार्यक्रमाच्या जागी ग्रामसचिवालयाच्या इमारतीच्या निधीवरून भाजप गट व काँग्रेस गट आमने-सामने आले आहेत. भाजप गटाचे म्हणणे आहे की, इमारतीसाठी आम्ही निधी मंजूर करून आणला आहे. तर काँग्रेसकडून आम्हीचं निधी आणला आहे. असा दावाप्रतिदावा केला जात आहे. इमारतीच्या कोनशीलेवर कुणाची नावे टाकायची यावरून चांगला वाद पेटला असून, गावामध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे.

Web Title: Sangli News congress - BJP Activists issue in Nagthane