सांगलीत साडे अकरापर्यंत २१ टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

सांगली - सांगली,मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला. पहिल्या तासात दहा टक्के इतके सरासरी मतदान झाले. साडेअकरापर्यंन्तच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 21 टक्के मतदान झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सांगली - सांगली,मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला. पहिल्या तासात दहा टक्के इतके सरासरी मतदान झाले. साडेअकरापर्यंन्तच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 21 टक्के मतदान झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

त्यात स्त्री मतदारांची संख्या 37 हजार 116 तर पुरुष मतदारांची संख्या 45 हजार 583 इतकी आहे. इतर 9 आहेत. आत्तापर्यंत 82 हजार 708 मतदारांनी मतदान केले आहे.

सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेसाठी आज सकाळी उत्साहात मतदानास सुरुवात झाली. काही ठिकाणी प्रशासनाने फुले देऊन  मतदारांचे स्वागत केले. पहिल्या तासात 10 टक्के मतदान झाल्याची माहिती आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिली.

78 जागांसाठी 451 उमेदवार भाग्य आजमावत असून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी समोर येथे भाजपचे आव्हान आहे.सुमारे तीन हजार कर्मचारी व दोन हजार पोलिस अशी यंत्रणा आहे. विक्रमी मतदान होईल अशी अपेक्षा आहे.

निवडणूक रिंगणातून...
गेली पंधरा वर्षे सत्ताधारी आणि विरोधकाच्या भूमिकेत असलेले काँग्रेस-राष्ट्रवादीने या निवडणुकीत आघाडी  केली आहे. मैत्रीपूर्ण लढतीसह काँग्रेस ४९ जागावर तर राष्ट्रवादी ३४ जागांवर लढत आहे. भाजप सर्व ७८ जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यात एक जागा पुरस्कृत आहे. शिवसेनेने ५१ जागा चिन्हावर, तर सहा जागांवर अपक्षांना पुरस्कृत केले आहे. याशिवाय जिल्हा सुधार समिती २५ जागांवर लढत आहेत.

गेले पंधरा दिवस विविध पक्षांच्या उमेदवारांनी घरा- घरापर्यंत जाऊन मतदारराजाला पायघड्या घातल्या  आहेत. याशिवाय अपक्षांची विकास महाआघाडी चर्चेत आहे. गेले पंधरा दिवस या सर्वांनीच टिच्चून  प्रचार करीत रान उठवले आहे. दुसरीकडे प्रशासनानेही मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी प्रशासनाने व्यापक जागृती केली आहे. मतदार जागृतीसाठी आवाहन, आदर्श मतदान केंद्रे, सैनिकांसाठी मतदान, जास्तीत जास्त मतदार नोंदणी, व्होटर ॲपसारख्या साधनांद्वारे मतदारांना सर्व माहिती उपलब्ध करून देणे, मतदार जागृतीसाठी व्यापक प्रबोधन फेरी असे अनेक उपक्रम-प्रयत्न स्तुत्य होते. यावेळी प्रथमच ‘तुम्ही तुमचा उमेदवार जाणून घ्या’ असा  अभिनव उपक्रम राबवला गेला. एरवी निवडणूक  अर्जाच्या गठ्ठयात बंदिस्त होणारी उमेदवाराची ‘कुंडली’ प्रशासनाने यावेळी प्रथमच चौका चौकात झळकली आणि या कुंडलीचे सार्वत्रिक दर्शन झाले.
 

Web Title: Sangli News corporation election report