सांगली-मिरजेत मतदान केंद्राचे वेगळे दर्शन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

सांगली - मतदारांसाठी लाल गालिचा, पुष्पगुच्छ, पताके, सनई वादन, रांगोळी, पहिल्या मतदाराचे औक्षण असे बरेच काही अभुतपूर्व असे आज मतदान केंद्रावर पहायला मिळाले.

सांगली - मतदारांसाठी लाल गालिचा, पुष्पगुच्छ, पताके, सनई वादन, रांगोळी, पहिल्या मतदाराचे औक्षण असे बरेच काही अभुतपूर्व असे आज मतदान केंद्रावर पहायला मिळाले. काही मतदान केंद्रावर काल रात्री विद्युत रोषणाईही केली होती. निवडणूक हा लोकशाही प्रक्रियेचा उत्सवच. आज निवडणूक आयोगाच्या आदेशाने आदर्श मतदान केंद्राचा उपक्रम राबवण्यात आला. सुमारे अडीचशे केंद्रे आदर्शवत अशी करण्यात प्रशासनाला यश आले. 

निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त रवींद्र खेबुडकर यांचे खणभागातील मौलाना अब्दुल कलाम आझाद विद्यामंदिर येथील केंद्रावर जंगी स्वागत झाले. यावेळी उपायुक्त श्रीमती स्मुती पाटील, प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार उपस्थित होते. नव्या मतदारांचे व मतदार लाल गालीचा अंथरून स्वागत झाले.

केंद्रावर मंद संगीत सुरु होते. राष्ट्रीय कर्तव्याचा मतदानाचा हक्क प्रसन्न मनाने बजावला जावा हा प्रशासनाचा हेतू. सांगली जिमखाना येथे जिल्हाधिकारी वि.ना काळम-पाटील, जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी सह परिवार मतदान केले. 

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी मतदानाचच्या पुर्व संध्येला प्रभाग 11 माधवनगर रोड, फौजदार गल्ली, बदाम चौक, नळभाग, हिंदु-मुस्लीम चौक, मिरज येथील बागवान गल्ली, बसवेश्वर चौक, धनगर गल्ली, मार्केट चौक या संवेदनशिल केंद्राची पाहणी केली. उपायुक्त सुनिल पवार उपस्थित होते.

 

Web Title: Sangli News corporation election report